छगन भुजबळ आणि सुहास कांदेंच्या वादात अंडरवर्ल्डची एन्ट्री?

छोटा राजनच्या पुतण्याने फोन करून धमकी दिल्याचा कांदे यांचा आरोप
कांदे-भुजबळ वाद; छोटा राजनने धमकी दिल्याची कांदेंची तक्रार!
कांदे-भुजबळ वाद; छोटा राजनने धमकी दिल्याची कांदेंची तक्रार!Saam Tv
Published On

अभिजित सोनावणे

नाशिक - नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे Suhas Kande आणि पालकमंत्री छगन भुजबळ chhagan bhujbal यांच्यातला वाद काही दिवसांपूर्वीच उफळला होता. भुजबळांनी नियोजन समितीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेचे Shivsena आमदार सुहास कांदे यांनी केला होता. याप्रकरणी आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणी धक्कादायक खुलासा सुहास कांदे यांनी केला आहे. भुजबळांविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी छोटा राजनच्या पुतण्याने फोन केल्याची तक्रार कांदे यांनी केली आहे.

हे देखील पहा-

सुहास कांदेंना फोन करून रिट पिटीशन मागे घेण्याची दिली धमकी;

भुजबळांविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी छोटा राजनच्या पुतण्याने फोन केल्याची कांदे यांची तक्रार केली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी छोटा राजनच्या पुतण्याने धमकीचा फोन केल्याची तक्रार सुहास कांदे यांनी केली आहे. सुहास कांदे यांनी गंगापूर पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तांकडे दिला तक्रार अर्ज सादर केला आहे. तर सुहास कांदे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray भेटीला निघाले असल्याची माहिती मिळत आहे.

कांदे-भुजबळ वाद; छोटा राजनने धमकी दिल्याची कांदेंची तक्रार!
Mumbai: डॉक्टरांचा हलगर्जीपणा; गर्भवती महिलेसह अर्भकाचा मृत्यू!

सुहास कांदे आणि छगन भुजबळांमध्ये भर मंचावर रंगला होता वाद;

11 सप्टेंबरला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते आणि त्यांचा हा दौरा वादळी ठरला. कारण शिवसेना आमदार सुहास कांदे Suhas Kande आणि छगन भुजबळ यांची जोरदार खडाजंगी झाली. भर बैठकीत आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात बाचाबाची झाली. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी यांनी केली होती. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असे स्पष्ट केले होते. मात्र भर बैठकीत आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात बाचाबाची सुरु होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com