Chitra Wagh: 'अशा 56 नोटीशी..' महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसावर चित्रा वाघ कडाडल्या, रुपाली चाकणकरांवर केला हल्लाबोल

उर्फी जावेद प्रकरणात आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. महिला आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)
चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)SaamTV

Chitra Wagh: उर्फी जावेद प्रकरणावरुन आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवली होती.

या नोटीसीनंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही रुपाली चाकणकरांना खडेबोल सुणावले आहेत.

चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)
Nashik News: हेडफोनने घेतला तरुणीचा जीव, नाशिकमधील घटनेने परिसरात हळहळ

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसावर चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी "स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर," अशा शब्दात हल्लाबोल केला आहे.

त्याचबरोबर "जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली, असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)
Dwarkadas Mantri Bank : द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची निवडणूक बिनविराेध; जाणून घ्या नवे संचालक मंडळ

दरम्यान, उर्फी जावेदचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी भूमिका भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी घेतली होती. त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला होता. याबद्दल राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांनाच महिला आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे, त्याचबरोबर या नोटीसावर उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. तसेच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टिका केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com