Yawal Taluka News: आईच्‍या डोळ्यासमोर ७ वर्षाचा मुलगा बिबट्याच्‍या जबड्यात; शेतातून उचलून नेलं

Yawal Taluka: जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव साखळी परिसरात बिबट्याने शेतात खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केले.
बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, यावल तालुक्यातील किनगावमधील घटना
बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, यावल तालुक्यातील किनगावमधील घटनाGoogle
Published On

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव साखळी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करीत असलेल्या आईच्या जवळ खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना जंगलालगतच्या शेतामध्ये घडली.

यावल तालुक्यातील किनगाव जवळील साखळी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात काम करत असलेल्या एका आदिवासी महिलेच्या सात वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने अचानक हल्ला करून मुलाला उचलून नेले. आई आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत बिबट्याने त्याला ठार मारले होते.

बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, यावल तालुक्यातील किनगावमधील घटना
Tiger Attack : मासे विकून घरी परतताना घडले विपरीत; वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

जळगाव वन विभागाच्या यावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रातील किनगाव साकळी परिसरातील मानकी शिवारात एक ही घटना घडली. केशा प्रेमा बारेला (वय ७) हा आदिवासी मुलगा आपल्या आईसोबत जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने मुलाला तिच्या हातातून ओढून नेले आणि गंभीर जखमी केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे साखळी किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Edited By - Purva Palande

बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, यावल तालुक्यातील किनगावमधील घटना
Tiger-Lion: वाघ अन् सिंह कोणत्या प्राण्याला घाबरतात? 99 टक्के लोकांना माहीत नसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com