परभणी: सेलू शहरातील बिहाणी इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या कचरा डेपोच्या एका खड्यात नऊ वर्षांचा रेहान खाँन या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. सेलू शहरातील एका विटभट्टीवर काम करणार्या मजूराचा मुलगा कालपासून बेपत्ता असल्यामूळे त्याचा शोध सर्वजण घेत होते, पण काहीही थांगपत्ता लागत नव्हता. आज दुपारी कचरा डेपोत शोधाशोध सूरू केली असता पाण्याने व थर्माकॉलच्या कचर्यामूळे काहीच दिसत नव्हते. बांबूच्या साहाय्याने या चिमुकल्याचा मृत्यदेह बाहेर काढण्याता आला. (Child dies after falling into dumping ground hole in parbhani)
हे देखील पहा -
मुलाच्या पित्याने "माझा मूलाचा मृत्यू हा कचरा डेपोमूळेच झाला" असा आरोप केला. यावेळी स्थानिकांचा आक्रोश अनावर झाला होता. २०१२ सालापासून परिसरातील नागरिक कचरा डेपो हटवण्याची मागणी करत होते, मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. कचरा डेपोला संरक्षण भिंत व कसल्याही प्रकारची तार कंपाऊड वॉल नाही, तर सुरक्षारक्षकही या ठिकांनी तैनात नाही. पालिकेच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सेलू पोलिसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.