मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

कोयना धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने सांगलीत अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका कायम आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावरSaam Tv

सांगली - जुलै महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे Flood मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे Maharashtra मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आज  सांगली Sangli दौऱ्यावर जाणार आहेत. कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोयना धरणातून Koyna Dam विसर्ग करण्यात येत असल्याने सांगलीत अजूनही कृष्णा नदीची Krishna River पाणी पातळी वाढण्याचा धोका कायम आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये,  चिपळूण आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर आता सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. येथील नागरिकांचे जनजिवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यांना धीर देण्यासाठी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर आहेत.

हे देखील पहा-

असा असणार मुख्यमंत्री यांचा सांगली दौरा:

२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रुझकडे प्रयाण.

सकाळी ८.५५ वा. छ.शि.म.आं.विमानतळ सांताक्रुझ येथे आगमन.सकाळी ९ वा. विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.

सकाळी ९.५० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.

सकाळी ९.५५ वा. मोटारीने भिलवडी ता-पलूस, जिल्हा - सांगलीकडे प्रयाण.

सकाळी १०.५५ वा. भिलवडी, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

सकाळी ११.०५ वा. मोटारीने अंकलखोप, ता-पलूसकडे प्रयाण.

सकाळी ११.१० वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

सकाळी ११.२० वा. मोटारीने कसबे डिग्रज, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण.

सकाळी ११.५५ वा. कसबे डिग्रज जिल्हा - सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १२.०५ वा. मोटारीने मौजे डिग्रज, जिल्हा –सांगलीकडे प्रयाण.

दुपारी १२.१० वा. मौजे डिग्रज, जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १२.२० वा. मोटारीने आयर्विन पुल, सांगलीकडे प्रयाण.

दुपारी १२.३० वा. आयर्विन पुल, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर
जम्मू काश्मीरमध्ये नवा कायदा; सैन्यावर दगडफेक करणाऱ्यांना पासपोर्ट आणि सरकारी नोकरीला मुकावे लागणार

दुपारी १२.४० वा. मोटारीने हरभट रोड, सांगलीकडे प्रयाण.

दुपारी १२.४५  वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १२.५५ वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण.

दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद.

दुपारी १.४५ वा. मोटारीने भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेजकडे प्रयाण.

दुपारी १.५० वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव.

दुपारी २.१५ वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

दुपारी ३.३० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.

दुपारी ३.३५ वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com