कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी, CM शिंदेंच्या घोषणेनंतर शासन निर्णय

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
Eknath shinde
Eknath shinde saam tv
Published On

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी (Toll Free) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि.२७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे.मुंबई -बॅंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि.११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

Eknath shinde
Eknath Shinde |'अनेकांना वाटतंय सरकार कोसळणार, पण...';मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी (Ganpati festival) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

दिनांक २७ ऑगस्ट ते दिनांक ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई -बॅंगलोर राष्ट्रीय महामार्ग (४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (६६) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

Eknath shinde
Virat Kohli : तुझ्या फॉर्मसाठी प्रार्थना करतोय, पाकिस्तानचा 'हा' खेळाडू विराट कोहलीला काय म्हणाला?

या टोलमाफी सवलतीसाठी "गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक,चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस किंवा पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे,वाहतूक पोलीस चौक्या व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com