सातारा : राज्यातील जनतेने मतदार यादीत त्यांचे नाव नोंदवावे यासाठी जागृतीपर अभियान राबविण्यात येतात. यंदा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती यांच्या वतीने राज्यातील नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या ganesh festival काळात “उत्सव गणेशाचा-जागर मताधिकाराचा’ या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची घाेषणा मुख्य निवडणूक अधिकारी Chief Electoral Officer श्रीकांत देशपांडे shrikant deshpande यांनी नुकतीच केली आहे. देशापंडे म्हणाले मताधिकार हा १८ वर्षावरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नाेंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे.
हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणा-या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरेपेक्ष राहून आपला लाेकप्रतिनिधी निवडणे पैसे किंवा इतर अमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यासारख्या विषयांवर सजावटीतून जागृती करणे हा उद्देश आहे.
या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे राेख रक्कम २१ हजार , ११ हजार, पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. या बराेबरच एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारिताेषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभाग घेणा-या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी हाेऊ इच्छिणा-यांनी छायाचित्र व चित्रफित या गूगल अर्जावर भरुन पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अविराज मराठे ७३८५७६९३२८ किंवा प्रणव सलगरकर ८६६९०५८३२५ यांच्याशी संपर्क साधावा. १० ते १९ सप्टेंबर या कालावधीमधील आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.