चिकन, मटण म्हटलं की मांसाहार प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही... मात्र ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी खाण्यासंदर्भातील व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला घालत 5 महापालिकांनी अजब फतवा काढलाय... 15 ऑगस्टला चिकन, मटण, मच्छी विक्रीवर बंदीचा आदेश महापालिकांनी जारी केलाय.. त्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळालीय...
याच मटन शॉप बंद ठेवण्याच्या निर्णयावरुन मनसे नेते राजू पाटील यांनी थेट मांसाहारी हॉटेल, KFC, मॅकडोनाल्ड बंद ठेवणार का? असा सवाल करत आदेश मागे न घेतल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिलाय.. तर दुसरीकडे नागरिकांनीही चिकन, मटन बंदीच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केलाय.
स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या महापालिकांनी घेतलाय? पाहूयात.....
मटणावर बंदी, स्वातंत्र्यावर घाला
कल्याण- डोंबिवली महापालिका-
स्वातंत्र्यदिनी मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश
मालेगाव
स्वातंत्र्यदिनीच मांस विक्रीवर बंदी
छत्रपती संभाजीनगर
15 आणि 20 ऑगस्टला मटन विक्रीवर बंद
नागपूर महापालिका
स्वातंत्र्यदिनाचं कारण देत मांस विक्री बंद
अमरावती
15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी
मटन विक्रीवर बंदी घालणाऱ्या महापालिकांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कान टोचले आहेत.
भारतीय राज्यघटनेनं कलम 21 अंतर्गत खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिलाय.. मात्र आता महापालिका कुणाचा धार्मिक इगो कुरवाळण्यासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला करत असतील तर संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन त्यांच्या मनमानीला चाप लावण्याची गरज आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.