Chhatrapati Sambhajinagar News: संभाजीनगरात आता सुरक्षेची हमी! शहरात पोलिसांची पंचस्तरीय गस्त, ५१ पोलीस अधिकारी तैणात

Chhatrapati Sambhajinagar Upadte: नागरिकांना सुरक्षेची हमी देण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून शहरात आता पाच स्तरीय गस्तीला सुरुवात करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Police
Chhatrapati Sambhajinagar Policesaam tv

Chhatrapati Sambhajinagar Police: छत्रपती संभाजीनगर शहरात आता पोलिसांची पंचस्तरीय गस्त असणार आहे. छत्रपती संभाजीनगरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षेची हमी देण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून शहरात आता पाच स्तरीय गस्तीला सुरुवात करण्यात आली आहे.

जनरल चेकिंग, झोनल चेकिंग, मुख्यालय पेट्रोलिंग, गुड मॉर्निंग पेट्रोलिंग आणि दिवसपाळी पेट्रोलिंग यापमाणे ही गस्त सुरू होणार असून यासाठी ५१ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. जनरल चेकिंग गस्तीची जबाबदारी सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडे सोपविली आहे. (Latest Breaking News)

Chhatrapati Sambhajinagar Police
Kishor Aware News: किशोर आवारे हत्या प्रकरण! बापाला मारल्याच्या रागातून केली निर्घृण हत्या; नगरसेवकाच्या मुलास अटक

हे अधिकारी अचानक पोलिस ठाण्याला भेट देतील आणि पोलिस ठाण्याचे लॉकअप गार्ड, अंमलदार, सेंट्रल ड्यूटी अंमलदार सतर्क आहेत की नाहीत याची पाहणी करतील. रात्री अपघात, खून, चोरी, दरोडा अशा गंभीर स्वरुपाच्या घटना घडल्यास हे अधिकारी फौजफाटा घटनास्थळी पाठवतील. (Latest Political News)

Chhatrapati Sambhajinagar Police
Women Safety: गर्दीत चुकीचा स्पर्श करणाऱ्या नराधमांना मिळणार शिक्षा; 'या' जॅकेटमुळे हात लावताच लागणार करंट

झोनल चेकिंगसाठी पोलिस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. परिमंडळ १ आणि २ प्रमाणे ते गस्त घालतील. पेट्रोलिंग दरम्यान नाकाबंदीच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन आदेश, सूचना देतील. गस्तीवरील टू मोबाइल, पीटर मोबाइल, पीसीआर मोबाइल आणि रात्र गस्तीवरील कर्मचाऱ्यांना गस्तीविषयी सतर्क करतील. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे औरंगाबाद अधिक सुरक्षित शहर होणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com