Paper Leaked News: सिव्हिल इंजिनीअरिंगचा पहिल्या वर्षाचा पेपर फुटला, मराठवाडा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Engineering 1st Year Paper Leaked: आता मराठवाडा विद्यापीठातील सिव्हिल इंजिनीअरिंगचा पहिल्या वर्षाचा पेपर परीक्षेच्या आधीच मोबाईलवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 Engineering 1st Year Paper Leaked:
Engineering 1st Year Paper Leaked: Saamtv

छत्रपती संभाजीनगर, ता. २७ मे २०२४

राज्यात अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटीचे वारंवार समोर येत आहेत. पेपर फुटीविरोधात कडक कायदे करण्याची मागणीही विरोधक तसेच विद्यार्थी वर्गातून होत आहे. अशातच आता मराठवाडा विद्यापीठातील सिव्हिल इंजिनीअरिंगचा पहिल्या वर्षाचा पेपर परीक्षेच्या आधीच मोबाईलवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात हा प्रकार घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिव्हिल इंजिनीअरिंगचा पहिल्या वर्षाचा पेपर परीक्षा सुरू असतानाच लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापुर्वीच संबंथित विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल झाली.

समोर आलेल्या माहितीनुसार, या महाविद्यालयामध्ये टी. ई सिव्हिल इंजिनिअरिंगच्या इफेक्टिव टाऊन प्लॅनिंग या विषयावरील आज पेपर होता. मात्र परीक्षा सुरू होण्यापुर्वीच हा पेपर लीक झाल्याची माहिती परीक्षा नियंत्रकाकडे आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत विद्यालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून परीक्षा नियंत्रण विभागाकडून चौकशी सुरू आहे.

 Engineering 1st Year Paper Leaked:
Maharashtra Politics: लोकसभेनंतर विधान परिषदेच्या उमेदवारीचा पेच! महायुती- मविआमध्ये इच्छुकांची गर्दी; ठाकरेंच्या 'सांगली पॅटर्न'ने डोकेदुखी वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com