Chhatrapati Sambhajinagar News : इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयात बेड राखीव ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Chhatrapati Sambhajinagar News : निवडणुकीच्या कामादरम्यान कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय समस्या उद्भवल्य तर त्या दृष्टीने देखील प्रशासनाने तयारी केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSaam TV
Published On

Chhatrapati Sambhajinagar :

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगासह संपूर्ण प्रशासन कामाला लागलं आहे. निवडणुकीच्या कामादरम्यान कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय समस्या उद्भवल्य तर त्या दृष्टीने देखील प्रशासनाने तयारी केली आहे.

कर्मचाऱ्यांना वैद्यकीय समस्या उद्भवल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयांनी काही बेड्स आरक्षित ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणुकीच्या कामकाजाच्या दरम्यान एखाद्या अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्यांची अचानक तब्येत बिघडून काही वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे. या उद्देशाने जिल्ह्यातील हॉस्पिटल्सला सूचना देण्यात आले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Amaravati Politics : अमरावतीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठा ट्विस्ट; उमेदवार मागे घेत आनंदराज आंबेडकर यांना दिला पाठिंबा

कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांना इलेक्शन ड्युटी, निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

राज्यातील प्रादेशिक विद्यापीठे आणि महाविद्यालयातील एकूण कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या तुलनेत 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच निवडणूक कामासाठी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आहेत. तरी देखील मराठवाडा विभागातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 100 टक्के महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटीवर पाचारण केले आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Raju Shetti: मला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही; राजू शेट्टी धैर्यशिल मानेंवर भडकले; ठाकरेंना दोनवेळा भेटल्याचेही सांगितलं

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामात सहभागी करून घ्यावे अशी मागणी विद्यापीठातील काही अधिसभा सदस्यांनी एक लेखी तक्रार निवडणूक आयुक्तांकडे केली. महाविद्यालयातील शंभर टक्के प्राध्यापक व इतर कर्मचारी निवडणुकीच्या कामात सहभागी करून घेतले तर दोन दिवस महाविद्यालय पूर्णतः बंद राहतील. त्यामुळे परीक्षेचे कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामावर त्याचा विपरीत परिणाम होईल, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com