Chhatrapati Sambhaji Nagar Crime: तोंडात बोळा कोंबून बाळ झुडुपात फेकलं; भयंकर घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं

Crime News: बाळाच्या तोडात बोळा कोंबून त्याला एका पिशवीतून झुडूपात फेकून देण्यात आलं.
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji NagarSaam TV

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर परिसरातून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका शनी मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास नवजात अभ्रक आढळून आलं आहे. बाळाच्या तोडात बोळा कोंबून त्याला एका पिशवीतून झुडूपात फेकून देण्यात आलं. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latets Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील क्रांती चौकाजवळील समतानगरात शनी मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास हे बाळ काही व्यक्तींच्या पाहण्यात आलं. बाळाची अवस्था पाहून नागरिकच काय पण पोलीसही हादरून गेले होते.

Chhatrapati Sambhaji Nagar
Mumbai Crime News : विकासकाने पालिकेला घातला ५ कोटींचा गंडा! सदनिकांची केली परस्पर विक्री

तोंडात बोळा कोंबून पिशवीत दोन दिवसांचे बाळ झुडुपात फेकून देण्यात आले होते. वेळीच पोलिसांची मदत मिळाली म्हणून मोठा अनर्थ टळला. नाहीतर हे जग पाहण्याआधी बाळाचा जीव धोक्यात आला असता. डायल 112 कर्मचाऱ्यांनी बाळाला (Baby) ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात त्यावर उपचार केले. तसेच नंतर महिला व बालकल्याण समितीकडे हे बाळ सुपूर्द करण्यात आले. बाळ नेमके कोणी व‌ कशासाठी टाकले याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com