Nashik : 'कार्यकर्त्याने केवळ त्यांना'; गुन्हा दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले.., (पाहा व्हिडीओ)

छगन भुजबळांविरोधात चेंबुर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Chhagan Bhujbal , Nashik
Chhagan Bhujbal , NashikSaam Tv
Published On

- तबरेज शेख

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या विरोधात चेंबुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करण्यात आला आहे. चेंबुर येथील एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पाेलीसांनी (police) भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भुजबळ यांनी आज दुपारच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय झालं आहे याची मला माहिती नाही परंतु मला त्रास देण्याचं काम सुरु झाल्याचं म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

ललितकुमार टेकचंदानी असं भुजबळ यांच्याविरोधात तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे. टेकचंदानी यांनी जबाबात म्हटलं की छगन भुजबळ यांना दोन व्हिडीओ पाठवले होते. त्यामध्ये भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेच टेकचंदानी यांना धमक्या देणारे कॉल्स आणि मेसेज यायला लागले.

Chhagan Bhujbal , Nashik
Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं

या मेसेजमध्ये शिवीगाळ केल्यासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी छगन भुजबळ यांच्यासह अन्य दाेघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पाेलीस करीत आहेत. दरम्यान आज भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भुमिका स्पष्ट केली.

Chhagan Bhujbal , Nashik
Maharashtra: शिंदे - फडणवीस सरकारनं केला माेठा फेरबदल; 44 आयएएस अधिक-यांना मिळाली नवी नियुक्ती

भुजबळ म्हणाले गुन्हा दाखल झाल्याबाबत मला काही माहिती नाही. मला माध्यमातूनच ही गाेष्ट समजली आहे. माझ्यासोबत गेल्या दहा वर्षापासून शत्रुत्व पतकरलेले ललित टेकचंदानी यांनी हा गुन्हा दखल केला आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याशी बोललाे नाही. मला त्यांनी सरस्वती पूजन या गाेष्टीवरून त्रास देणे सुरु केले आहे. (Tajya Batmya)

Chhagan Bhujbal , Nashik
Pune : पुणेकरांनो ! इकडे लक्ष द्या, चांदणी चौक पूल पाडताना शहरातील 'या' मार्गावरील वाहतूक बंद

त्यामुळे माझ्या काही कार्यकर्त्यांनी फक्त याबाबत त्यांना जाब विचारला. त्यांना कोणीही धमकी दिली नाही. मला माझ्या नंबरवर अतिशय घाणेरडं संदेश टाकून त्रास देण्याचा प्रकार सुरु झाला आहे. दरम्यान यात राजकीय हस्तक्षेप आहे असे मला वाटत नाही. हा बालिशपणा आहे असेही भुजबळांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Chhagan Bhujbal , Nashik
Navratra 2022 : देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात; दाेन ठार, पाच जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com