विमानतळावरील सोने तस्करीचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र चेन्नई विमातळावर घडलेला प्रकार ऐकून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. साबीर अली या चेन्नईस्थित YouTuber ने गुदद्वारातून सोने तस्करी करण्यासाठी ७ जणांना प्रशिक्षण देऊन कामावर ठेवलं होतं. धक्कादायक म्हणजे तस्करीतून मिळणारं सोनं विक्रीसाठी चक्क चेन्नई विमानतळावरच दुकान थाटलं होतं आणि खुलेआम सोन्याचा बाजार सुरू होता. याप्रकरणी साबीर अली यांच्यासह ७ जणांना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत.
29-30 जून रोजी या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ज्यामुळे 29 वर्षीय अली आणि त्याच्या ७ साथीदारांना अटक करण्यात आली. ज्यांनी सोन्याची तस्करी केली त्यांना प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये आणि त्यांनी लपविलेल्या सोन्याच्या प्रत्येक बॉलसाठी अतिरिक्त ५००० रुपये दिले जात होते. मात्र साबीर त्याने सुरू केलेल्या ‘शॉपिंगबॉय’ या यूट्यूब चॅनेलमुळेच
दोन महिन्यांत त्यांनी 267 किलो सोन्याची तस्करी केली आहे, ज्याची बाजारातील किंमत 167 कोटी आहे. या कालावधीत साबीरने 2.5 कोटी रुपयांची कमाई केल्याचा संशय कस्टम अधिकाऱ्यांना आहे. तस्करी करणाऱ्या एका आरोपीने दोन महिन्यांत 80 वेळा तस्करी केल्याची कबुली दिली आहे.
प्रत्येक सिलिकॉन बॉलमध्ये पॅक केलेले सुमारे 300 ग्रॅम सोन्याची पेस्ट किंवा पावडर भरली जात असे. तस्कर परदेशातून उड्डाण करणाऱ्या वाहकांकडून ट्रान्झिट लाउंजमध्ये माल घेतला जात असे. विमान लॅण्ड होताच तिथे त्यांची वाट पाहात असलेल्या ग्राहकांना नंतर दिलं जात असे. अखेर उत्पादन शुल्क विभागाला सुगावा लागला आणि मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. दरम्यान एक YouTuber अशा पद्धतीने तस्करी करत असल्याचं समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. तसंच उत्पादन शुल्क विभागासमोर तरस्की रोखण्याचं नवं आव्हान निर्माण झालं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.