Chandrashekhar Bawankule: कार्यकर्त्यांचा संयम सुटलाय; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Chandrashekhar Bawankule: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam Tv

Bawankule warns Uddhav Thackeray:

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जळगावमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरादार घणाघात केला. फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी त्यांना टरबुज्या नावानं डिवचलं.(Latest News on Politics)

यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे काल जे बोलले त्यावरून त्यांची मानसीक स्थिती ढासळत असल्याचं दिसत आहे. टीका करताना राजकारणाच्या काही मर्यादा असतात.

भाजपच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला आहे. ते काय करतील हे सांगता येत नाही. आम्ही कायदा सुव्यवस्था तोडणार नाही, मात्र उद्धव ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना विकासाची चर्चा करायची नाही, उठसूट चर्चा करून आरोप करत असल्याचा टोलाही बावनकुळेंनी लगावलाय.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, मराठा आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे. आजच्या बैठकीत मलाही निमंत्रण आहे. मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण मिळेल, असा विश्वास आहे. याचपार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलीय. त्यामुळे तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दोन्ही भावात वाद निर्माण करणे चुकीचे आहे, सरकार आजच्या बैठकीत योग्य निर्णय घेईल. तसेच मनोज जरांगे पाटील आपले उपोषण मागे घेतील असा विश्वासही त्यांनी वर्तवलाय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

जळगावमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी ४ ते ५ वेळा टरबुज्या असा शब्द उच्चारला. 'मला माहिती नाही, तुम्ही जे टरबुज्या नाव घेताय असा माणूस मी पाहिलेला नाही'.

'टरबुज्या म्हणालात ना. टरबुज्या काय म्हणालात. टरबुज्या म्हणजे मोठं टरबूज असतं ते ना? असा माणूस पाहिलेला नाही. पण तुम्ही टरबूज म्हणालात ना. ठीक आहे, आता मी टरबुजा सारखा माणूस बघतो. टरबूज कोण आहे ते पण मी बघेन',अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं.

Chandrashekhar Bawankule
BJP on INDIA Meeting : 'इंडिया'ची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com