आता फटाफट अटेस्टेड! १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार, काय असतील जबाबदाऱ्या? वाचा

Chandrashekhar Bawankule On Voter Executive Officer: राज्यात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
executive officer for every five hundred voters
executive officer for every five hundred voters SaamTv
Published On

नागपूर : महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. त्यामुळे राज्यात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद नसणार आहे, तर त्यांना १३ ते १४ विशेष अधिकार देण्यात येणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

आतापर्यंत प्रत्येक एक हजार मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा. मात्र आता राज्य सरकारने नवा जीआर काढून प्रत्येक ५०० मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहेत. विशेष म्हणजे आजच्या जीआरमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारींचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे.

executive officer for every five hundred voters
Tuljabhavani Temple : सिद्धीविनायक मंदिरानंतर तुळजाभवानीच्या मंदिरातही लागू होणार ड्रेस कोड? मंदिर संस्थानकडे होतेय मागणी

लवकरच प्रत्येक जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड आणि नेमणूक केली जाणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

नेमक्या जबाबदाऱ्या काय?

* राज्यात प्रत्येक ५०० मतदारांमागे एक याप्रमाणे नवे १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जातील.

* अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार आहेत.

* विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे.

* प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे.

* विशेष कार्यकारी अधिकारी होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.

* वय २५ वर्षांपेक्षा जास्त आणि ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.

* ज्या तरुणांना, नागरिकांना सामाजिक कामांमध्ये रस आहे. त्या तरुणांना आणि नागरिकांना यामध्ये संधी मिळणार आहे.

* महसूलमंत्री राज्याच्या निवड समितीचे अध्यक्ष राहणार आहेत.

* विशेष कार्यकारी अधिकारी निवडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल मंत्र्यांचे अध्यक्ष पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची समिती राहील.

* शासनाचा नवीन जीआर आल्यानंतर आताचे विशेष कार्यकारी अधिकार आहे. त्यांचे पद रद्द होऊन नव्याने नियुक्त्या केल्या जातील.

* शासकीय योजनांसाठी जे काही प्रमाणपत्र लागतात, ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारीकडे असणार.

* विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल. सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना असतील.

executive officer for every five hundred voters
Marathi Language : सरकारी, निमसरकारी, पालिका ऑफिसमध्ये मराठी भाषा अनिवार्य; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com