Tiger Attack
Tiger AttackSaam TV

Viral Video: वाघांनं डेरिंग केली पण म्हशींनी चांगलीच जिरवली; वाघाच्या जबड्यातून रेडकूची सुटका; पाहा व्हिडीओ

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरातील ही घटना आहे.
Published on

Chandrapur News: वाघाने म्हशीच्या रेडकूवर केलेल्या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. मात्र म्हशींच्या कळपाने या वाघाला पळवून लावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरातील ही घटना आहे.

व्हिडीओत दिसत असलेल्या दृष्यांनुसार, एका वाघाने म्हशीच्या कळपावर हल्ला चढवत म्हशीच्या एका रेडकूला पकडले. मात्र मात्र मागून इतर म्हशीनी वाघावर चाल केल्याने वाघाने घाबरून पळ काढला. दुपारच्या दरम्यान कार्यालयाच्या अगदी जवळ झालेल्या या हल्ल्यामुळे वीज केंद्रातील कर्मचारी मात्र दहशतीत आहेत. 

महाऔष्णिक वीज केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाघाचा हल्ला कैद झाला आहे. महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहून नेणारी पाईपलाईन आणि 400 केव्ही उपकेंद्राच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत हा हल्ला झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com