कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

भाजपने ही निवडणूक हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करुन लढवली होती.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam Tv

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चीत झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या आघाडीवर आहेत. आता याच निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्दयांवर लढली. पुर परिस्थिती, विमानतळ विस्तारीकण हे विकासाचे मुद्दे मान्य नाहीत असं बंटी पाटलांना म्हणायचंय का? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे त्याचबरोबर त्यांनी आपला पराभव मान्य केला आहे. (Kolhapur North By-election Result)

भाजपने ही निवडणूक हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करुन लढवली होती. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की हिंदुत्व हा आमचा श्वास आमचा राजकीय अजेंडा नाही. आम्ही थकलो नाही. इंदिरा गांधीच्या हत्येच्या वेळी दोन खासदार होते त्यावर आम्ही हार मानली नाही. या निवडणुकीत प्रचारासाठी बाहेरुन लोक आणले अशी टीका भाजपवरती होत होती त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आमचं कुटुंब आहे कोणाच्याही घरी लग्न असले तरी आम्ही जातो.

Chandrakant Patil
नवनीत राणांची भाषा भाजपची, कदाचीत त्यांना पुन्हा...; रोहित पवारांचे टिकास्त्र

दरम्यान भाजपने या निवडणुकीत हिंदूत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. तर महाविकास आघाडीने शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार या निवडणुकीत विजय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला होता. महाविकास आघाडीतील सर्वच जेष्ठ नेते तसेच युवा नेतेही प्रचारासाठी कोल्हापुरात होते. तसेच भाजपच्या बाजूने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून होते. एखाद्या सदस्याचे जर निधन झाले तर त्या जागेवर होणारी निवडणुक बिनविरोध होत असते अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे परंतु इथे तसे झाले नाही अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com