Chandrakant Patil News: शेतकरी तरुणानं थांबवलं चंद्रकांत पाटलांचं भाषण; मध्येच विचारला 'हा' प्रश्न, पाहा VIDEO

Farmer Ask Question Chandrakant Patil: यावेळी शेतकरी तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रकांत पाटील आपल्या भाषणात मोदींची लोकप्रियता सांगत होते.
Chandrakant Patil News
Chandrakant Patil NewsSaam TV
Published On

Chandrakant Patil Speech In Pune:

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या भाषणावेळी शेतकरी तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना तरुणाने मध्येच त्यांना प्रश्न विचारत गोंधळ घातला. (Latest Marathi News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा कार्यालयाचा आज उद्घाटन सोहळा सुरू होता. यावेळी शेतकरी तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रकांत पाटील आपल्या भाषणात मोदींची लोकप्रियता सांगत होते.

यावेळी "भामा आसखेड धरणातील पाणी भामा नदीपात्रात सोडावं..." यावरून चंद्रकांत पाटलांना तरुणाने प्रश्न विचारला होता. सभेनंतर पोलीसांकडून शेतकरी तरुणाची विचारपूस करत असताना त्याच्या खिशात किटकनाशक औषध बाटली आढळून आली. यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

तरुणाने घातलेल्या गोंधळानंतर चंद्रकांत पाटलांनी भाषण करताना त्याला चांगलच झापलं. "विरोधकांकडून सभेत गोंधळ घालण्यासाठी अशी लोकं पाठवली जातात. मुख्य वक्ता बोलत असताना प्रश्न विचारायचा आणि फोटो काढून भाषणात गोंधळ झाल्याचं व्हायरल करायचं. माझा ४५ वर्षाचा अनुभव आहे. अनेक मंत्री पद मी पाहिलीत.", अशा शब्दांत त्यांनी शेतकरी तरुणाला सुनावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com