- रणजीत माजगावकर
चांदोली प्रकल्पग्रस्तांना (chandoli project affected persons) कायद्यानुसार पर्यायी जमिनीचे वाटप तात्काळ करावे या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या (Shramik Mukti Dal) वतीने कोल्हापुरातील (kolhapur latest marathi news) मुख्य वनसंरक्षक विभाग कार्यालय परिसरात धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून धरणग्रस्तांनी मुला-बाळांसह हे आंदाेलन छेडले आहे. (Maharashtra News)
गेल्या 30 वर्षापासून चांदोली प्रकल्पग्रस्तांना कायद्यानुसार पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आले नसल्याची माहिती आंदाेलकांनी दिली. प्रत्येक वेळी शासन दिरंगाई करीत असल्याने आता तब्बल २०० पेक्षा अधिक धरणग्रस्तांनी कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक विभाग कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडला आहे.
श्रमिक मुक्ती दलचे उपाध्यक्ष नजीर चौगुले म्हणाले गेल्या 26 वर्षांपासून जमिनीसाठी आमचा लढा सुरु आहे. केवळ आश्वासन देत प्रशासनाने आमची फसवणुक केली. जोपर्यंत शंभर टक्के जमीन आम्हांला मिळत नाही. तसेच आमच्या अन्य प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदाेलन सुरुच ठेवणार.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आम्हांला प्रशासनाने दहा दिवसांत प्रश्नाची साेडवणुक करु असे आश्वासन दिले आहे. ताेपर्यंत आम्ही येथेच बसणार आहे. त्यानंतरही प्रश्न न सुटल्या आंदाेलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे चाैगुले यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.