राहेरी पुलावरून जड वाहतूक सुरूच, अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष...

जड वाहतूक सुरू असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता...
राहेरी पुलावरून जड वाहतूक सुरूच, अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष...
राहेरी पुलावरून जड वाहतूक सुरूच, अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष...Saam Tv
Published On

संजय जाधव

बुलढाणा : मुंबई - नागपूर Nagpur राज्य महामार्गावरील सिंदखेड राजा Sindkhed Raja तालुक्यातील खडकपूर्णा नदीवर असलेल्या राहेरी पुलाची Raheri Flyover कालमर्यादा संपल्याने, या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अजूनही या पुलावरून जड वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राहेरी येथील हा इंग्रज कालीन पूल असून या पुलाच्या बांधकामाला शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. त्यामुळे हा पूल आता जीर्ण झाला आहे. वेळोवेळी लाखो रुपये खर्च करून पुलाची डागडुजी देखील करण्यात आली आहे. दरम्यान काही ठिकाणी लोखंडी प्लेट टाकण्यात आल्या आहेत तरी देखील या पुलाला खड्डे आणि भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रस्त्यावरून जड वाहतूक बंद केली आणि पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कमान देखील लावल्या होत्या.

हे देखील पहा -

मात्र या पुलावरून वाहतूक करत असताना फक्त एसटी महामंडळाच्या बसेसला मज्जाव असल्याचे दिसून येत आहे. इतर सर्वच वाहने राजरोसपणे सुरू आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला लावलेल्या लोखंडी कमान देखील अज्ञातांनी तोडून टाकलेल्या असून त्यांच्यावर देखील कोणतीही कारवाई झालेली नाही. या सर्व बाबींकडे संबंधित विभागाचे मात्र पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या पुलावरून जड वाहतूक अशीच सुरू राहिल्यास मोठा अपघात होऊ शकतो.

राहेरी पुलावरून जड वाहतूक सुरूच, अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष...
बदलापूरमधील बारवी धरण 92 टक्के फुल्ल

या पुलावरील वाहतूक तळेगाव मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र हा रस्ता रुंद असल्याकारणाने जड वाहतूक चालक आदेश झुगारून सर्व वाहने याच पुलावरूनच नेत आहेत. त्यामुळे येत्या काळात जर या पुलावरून मोठी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन वेळीच योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा पुन्हा एकदा याच परिसरात अपघातांच्या माध्यमातून मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com