BJP
BJP Saam Tv

राजकीय समीकरणे जुळवून भाजपने चाकूर नगरपंचायतीत मारली बाजी!

बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले.
Published on

लातूर : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत (Chakur Nagarpanchayat) पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले. तसेच शिरूर अनंतपाळ येथे भाजपाचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले, त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटरवर कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

हे देखील पहा :

लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकूर येथे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेस (Congress) या दोन पक्षांना मिळून आठ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाला (BJP) तीन जागा मिळाल्या. तथापि, भाजपाने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे जुळवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यापासून रोखले.

BJP
डॉक्टरकडे जायचंय सांगून तरुणी प्रियकरासह पळून गेली; मात्र त्यानेच केली तिची हत्या!

या नगरपंचायतीत बुधवारी अपक्ष नगरसेवक कपिल माकने निवडून आले, तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक अरविंद बिराजदार यांची निवड झाली. नगरपंचायत निवडणुकीत जेथे भाजपाला बहुमत मिळाले नाही तेथेही पक्ष राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीवर मात करेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दिला होता. त्यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी चाकूरमध्ये यश मिळविले. लातूर जिल्ह्यातच शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत भाजपाने ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते.

BJP
Kolhapur Breaking : वारे वसाहतीत दोन गटांत तुफान हाणामारी; तलवार हल्ल्यात चार जखमी!

मंगळवारी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका मायाताई धुमाळे यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी भाजपाच्याच नगरसेविका सुषमा मठपती यांची निवड झाली. पाटील यांनी चाकूर व शिरूर अनंतपाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे तसेच या यशाबद्दल माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह सर्व नेते कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. राज्यात नुकत्याच झालेल्या १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे. तसेच स्पष्ट बहुमत मिळालेल्या नगरपंचायतींच्या बाबतीतही भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com