Raigad Chain Snatching News: गप्पा मारणाऱ्या बहिणींना चोराने पायऱ्यांवरच गाठलं, मंगळसूत्र ओढून काही सेकंदात फरार; VIDEO Viral

Raigad Police: माणगाव पोलिसांनी (Mangaon Police) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे
Raigad CCTV
Raigad CCTV Saam TV

सचिन कदम, रायगड

Mangaon News: रायगडमध्ये (Raigad) एका आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र (Mangalsutra) चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. रायगडच्या माणगावमध्ये गुरुवारी ही घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) कैद झाली आहे. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी (Mangaon Police) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे

Raigad CCTV
Air India News: धक्कादायक! चालू विमानामध्ये पतीने पत्नीचा गळाच आवळला; एयर इंडियाच्या विमानातील थरार

मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव शहरातील बँक ऑफ इंडियामध्ये काही कामानिमित्त दोन वयोवृद्ध बहिणी जात होत्या. याच वेळी बँकेच्या बिल्डिंगमधील पायऱ्या चढताना या आजी थकल्या. त्यामुळे त्या पायऱ्यांवरच गप्पा मारत उभ्या राहिल्या. तेवढ्यातच एका चोरट्याने याच संधीचा फायदा घेतला. पायऱ्या उतरून आजीच्या दिशेने येऊन त्याने एका आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि फरार झाला.

या दोन्ही आजींनी चोराच्या मागे पळून त्याला पडण्याचा प्रयत्न केला. पण वयाच्या मानाने त्यांना काही पळता आले नाही आणि चोर फरार झाला. ही संपूर्ण घटना बँकेच्या बिल्डिंगमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी सुषमा मेथा (60 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. या मंगळसूत्राची किंमत साठ हजार रुपये आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Raigad CCTV
Maharashtra Politics: ठाकरे गटानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेतला वाद उफाळला; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच दोन गट भिडले

दरम्यान, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी मोठी चोरी झाल्याची घटना घडली. तिच्या खार येथील घरातून लाखो रुपये किमतीचे हिऱ्याचे कानातले चोरांनी लंपास केले. खार येथील घरातून मेकप ट्रेमधून अर्पिताचे हिऱ्याचे कानातले चोरी झाले होते. याप्रकरणी तिने खार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com