लस न घेताच कोविन ऍप वर आले सर्टिफिकेट !

कोविड प्रतिबंधक लस न घेताच लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद कोविन ऍप वर झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे.
लस न घेताच कोविन ऍप वर आले सर्टिफिकेट !
लस न घेताच कोविन ऍप वर आले सर्टिफिकेट !अजय दुधाणे
Published On

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील बारकुपाडा भागात राहणारे अशोक जाधव यांनी ऑनलाइन पद्धतीने कोविड लसीकरणाची नोंदणी केली होती. त्यानुसार ते करवले गावातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले होते. Certificate came on Cowin app without getting vaccinated

मात्र पाच तास उभे राहिल्यानंतर ही त्याना लस न मिळाल्याने ते घरी परत आले , त्यानंतर ते दुसऱ्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता तिथे आपले लसीकरण आधीच झाले असल्याचे त्याना सांगण्यात आले. तसा मेसेज ही अशोक जाधव यांच्या मोबाईल वर आला होता.

हे देखील पहा -

मात्र, आपण लस न घेताच आपले लसीकरण केल्याची नोंद झाल्याने अशोक जाधव यांना धक्काच बसला. आता आपण लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित राहणार का अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यांनतर जाधव यांनी करवले गावातील लसीकरण केंद्रावर जाऊन याबाबत तक्रार केली असता, तुम्ही दोन दिवसात परत या तुम्हाला लस दिली जाईल असे त्यांना सांगण्यात आले.

लस न घेताच कोविन ऍप वर आले सर्टिफिकेट !
कॉम्प्युटर कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक

या प्रकाराबाबत लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले कि, सॉफ्टवेअरच्या अडचणींमुळे ही घटना घडल्या असून याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या दोन ते तीन घटना या विभागात घडल्याचे समोर आले आहे. जो नोंदणी करतो त्याच्या मोबाईल वर येणारा गोपनीय नोंदणी क्रमांक हा दिल्याशिवाय लसीकरण होत नाही मात्र तो गोपनीय नंबर न देतात लसीकरण कसे झाले या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com