शिंदेंना असं अमृत पाजलंय की त्यांची कार बुलेट ट्रेनपेक्षा सुसाट धावेल - गडकरी

भाजपचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे.
Eknath Shinde And Nitin Gadkari
Eknath Shinde And Nitin Gadkarisaam tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई : राज्यात सत्तांतर झालं असून शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Government) मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीला लागलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षवाढीसाठी राजकीय मैदानात उतरली आहे. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेतेमंडळी शिंदे-फडणवीस सरकारला शुभेच्छा देत आहेत. अशातच भाजपचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. आम्ही आता एकनाथजींना असं अमृत पाजलं आहे की, त्यांची कार आता बुलेट ट्रेनच्याही पुढे सुसाट जाईल. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदे यांना सहकार्य कर. एकनाथ शिंदे आणि फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल, असं म्हणत गडकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकरावर विश्वास व्यक्त केला.

Eknath Shinde And Nitin Gadkari
धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही - उद्धव ठाकरे

माध्यमांशी बोलताना गडकरी पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे योगदान खूप आहे.देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावत आहे. समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात भर घालणार आहे. देशातच नाही तर जगात राज्य खूप पुढे जाईल.आम्ही दिल्ली मुंबई हायवे बनवत आहोत. 50 हजार कोटींचा मोठा पूल आपण बनवत आहोत. महाराष्ट्राचा जीएसटी माफ करा आणि पुलाच्या खालची जमीन मला द्या. मी 50 हजार कोटी खर्च करुन विकास करणार. जशी नवी मुंबई शहर बनले आहे,तसे नवे पुणे आणि औरंगाबाद करू. पुणे मुंबई आणि ठाण्याचे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत करा.

Eknath Shinde And Nitin Gadkari
...तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही धोका नाही - उद्धव ठाकरे

तसंच गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात शुगर इंडस्ट्रीमुळे खूप प्रगती झाली आहे. 50 टक्के शुगर राज्यात तयार होते. मुंबईत आता ई-बसेस आल्या आहेत. आता इ-व्हेईकलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील आहे. वॉटर टॅक्सीचा प्रकल्प झाला तर खूप फायदा होईल. आमची जंगलं खूप चांगली आहेत. मी एका गायकाला ताडोबात पाठवलं, तेव्हा त्याने एका दिवसात सात वाघ पाहिले.जंगल सफारी ही अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी मदत करू शकते. महाराष्ट्रातून पेट्रोल हद्दपार करा आणि इथेनॉलचा वापर करा, असं आवाहनही गडकरी यांनी केलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com