Dudh Bhesal : राष्ट्रवादीच्या नेत्याकडून भेसळयुक्त दूधाची पुण्यात विक्री; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाेलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे.
beed, milk adulteration, ncp leader satish shinde, pune fda department
beed, milk adulteration, ncp leader satish shinde, pune fda departmentsaam t

Beed News : बीड (beed) जिल्ह्यातील आष्टी गावात पावडर आणि रसायनापासून भेसळयुक्त दूध (milk adulteration) बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी बीड राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

beed, milk adulteration, ncp leader satish shinde, pune fda department
Kolhapur : दानपेटीत दान टाका, प्रसाद थेट आई अंबाबाईच्या चरणी... पूजकाचा Video Viral

आष्टी पोलीस आणि अन्न प्रशासनाने आष्टी शहरातील संभाजी नगर भागातील एका गोडाऊनवर छापा टाकला. त्यात भेसळयुक्त दूध बनवण्यासाठी लागणारे पावडर आणि रसायनाचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

beed, milk adulteration, ncp leader satish shinde, pune fda department
Jalna Accident News : जालना- अंबड महामार्गावर यात्रा स्पेशल बसला अपघात, 30 प्रवासी जखमी

भेसळीत राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात

विशेष म्हणजे हा गोरखधंदा राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकचं खळबळ उडाली आहे. या कारवाईत 132 पांढऱ्या गोण्या पावडर व पत्र्याचे 220 डब्बे रसायन असा 8 लाख 91 हजार 375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

एकास अटक

दरम्यान याप्रकरणी जगदंबा मिल्क ऍण्ड मिल्कसचे मालक तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सतीश नागनाथ शिंदे यांच्यासह अन्य एकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी नंदू मेमाणे याला अटक केली आहे. सतीश शिंदेचा पाेलिस शाेध घेताहेत.

दरम्यान सतीश शिंदे हे पावडर आणि रसायनापासून दूध बनवून (dudh bhesal) ते पुणे येथे विकत असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सह आयुक्त इम्रान हाश्मी यांनी फोनवरून दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com