गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ; कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल

सातारा न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSaam TV
Published On

कोल्हापूर : एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करुन हल्ला केला. या प्रकरणी १०९ एसटी कर्मचाऱ्यांसह वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. सदावर्ते यांना आता सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सातारा न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुन्हा सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई, सातारा नंतर आता कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि.स कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चा चे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Gunaratna Sadavarte
Satara | सदावर्ते यांना कोर्टात हजर करणार !;न्यायालयाचा बंदोबस्त वाढवला ,पाहा व्हिडीओ

मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

गुणरत्न सदावर्तेंना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपात गुरुवारी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना आज (शुक्रवार) सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दाेन्ही बाजूने जाेरदार युक्तीवाद झाला. न्यायाधिश श्री. शेंडगे यांनी सदावर्तेंना १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (gunratna sadavarte latest marathi update). आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्री. शेंडगे यांच्या समाेर गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले हाेते.

खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अपशब्द वापरुन सदावर्ते यांनी टीका केली हाेती. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने केली हाेती. मराठा आरक्षणालाही त्यांचा विराेध हाेता. सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याने स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी त्यांच्या विराेधात सन २०२० मध्ये सातारा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्या प्रकरणी त्यांना गुरुवारी सातारा पाेलिसांनी ताब्यात घेतलं हाेते. आज त्यांना न्यायालयात हजर केले हाेते.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com