कोळगाव येथील 28 वर्षीय विवाहितेचा नुकताच मृत्यू झाला हाेता. तिने आत्महत्या केल्याचे सांगितलं जात हाेते. परंतु तिच्या नातेवाईकांनी स्माशनभुमीत तसेच पाेलीस मुख्यालय येथे आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाेलिसांनी कायदेशिर कारवाई करण्यास प्रारंभ केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी - प्रियंका भाऊसाहेब येडे (वय 28 रा. कोळगाव, ता. गेवराई) असं विवाहितेचे नाव आहे. प्रियंकाचा 15 सप्टेंबरला मृत्यु झाला होता. तिने आत्महत्या केल्याचे तिच्या माहेरच्या लोकांना पटत नव्हते. तिच्या माहेरच्या माणसांनी त्यावर विश्वास न ठेवता पाेलिसांत धाव घेतली. आमच्या मुलीचा खून झाल्याचे सांगून खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी पाेलिसांना केली.
प्राथमिक माहितीनूसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातील टाळाटाळ केली हाेती. मात्र नातेवाईकांच्या आक्रमकतेपुढे आणि काही अंशी माहिती प्राप्त झाल्यानंतर पाेलिसांनी हालचाली केल्या. दरम्यान मृत महिलेचे शवविच्छेदन स्वाराती रुग्णालयात करण्यात आलं. याप्रकरणाच गेवराई पोलीस ठाण्यात प्रियंकाच्या पतीसह सासू सासरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.