Aurangabad Accident News
Aurangabad Accident NewsSaam Tv

Aurangabad Accident News : नाथसागर धरणासमोरच्या पुलावरुन कार कोसळली; तिघे जखमी

पैठण येथील नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून कार पाण्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद - पैठण येथील नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून कार पाण्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पैठण(Paithan) शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह जुने कावसान शेवगाव कडे जाणाऱ्या नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावर ही घटना घडली.

Aurangabad Accident News
Tamil Nadu : मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात, क्रेन उलटल्याने चौघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

सुदैवाने या अपघातात (Accident) कुठलीही जीवितहानी झाली नसून ३ जण जखमी झाली आहे. तर कारचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कार पुलावरून गोदावरी नदीच्या पाण्यात कोसळल्याची माहिती मिळताच या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात उतरून कारची काच फोडून तिन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर जखमी तिघांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठीक आहे.

Aurangabad Accident News
World's Top 10 Rich : जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर, अदानी कोणत्या स्थानावर?

पैठण शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह, जुने कावसान, शेवगावकडे जाणाऱ्या नाथसागर धरणाच्या (Nathsagar Dam) समोर असलेल्या पुलावरून नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. मात्र या पुलाला सुरक्षा कठडे नाहीत.

त्यामुळे अनेकदा असे अपघात होत असतात. त्यामुळे पुलावर सुरक्षा दृष्टिकोनातून लोखंडी कठडे बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र जायकवाडी प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com