हॉटेलची वेळ वाढवून देण्यासाठी व्यावसायिकांचे धरणे आंदोलन

अमरावती शहरातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार संचालकांनी आज एक दिवसाचा बंद पुकारला असून शहरातील सर्व हॉटेल व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
हॉटेलची वेळ वाढवून देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे धरणे आंदोलन
हॉटेलची वेळ वाढवून देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे धरणे आंदोलनअरुण जोशी

राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन हॉटेल व्यावसायिकांवर हेतुपुरस्सरपणे अन्याय करीत असल्याचा आरोप करीत अमरावती शहरातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार संचालकांनी आज एक दिवसाचा बंद पुकारला असून शहरातील सर्व हॉटेल व्यवसायिकांनी अमरावतीच्या Amaravati जिल्हाधिकारीCollector कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. आज दिवसभर आपले सर्व व्यवसाय बंद ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या हॉटेलच्या चाव्या सोपवीत शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.Businessmen's agitation to extend hotel hours

लॉकडाऊनLockdown पडल्यापासून निर्बंधाखाली असणारे हॉटेल व्यवसाय पुर्णपणे ढपघाईला आले आहेत आणि त्यासाठी सरकारणे आता तरी हॉटेल व्यवसायिकांच्या मागण्या मान्य कराव्या आणि राज्य सरकारने हॉटेल आणि बार व्यवसायिकांना रात्री ११ वाजेपर्यंत आपला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी आज अमरावती शहरातील सर्व हॉटेल व्यवसायिक आणि बिअर बार संचालकांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. सकाळपासूनच सर्व हॉटेल व्यवसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत असून त्यांनी आपल्या हॉटेलच्या चाव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे सोपविणार असल्याचं सांगितलं.

हॉटेलची वेळ वाढवून देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे धरणे आंदोलन
गावात मोबाइलचे टॉवर 'दोन' तरीही लागेनात 'फोन'

राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियमावलीत शिथिलता देत व्यावसायिकांना आपले व्यवसाय रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगीPermision दिली आहे. मात्र केवळ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार संचालकांना दुपारी चार पर्यंतच व्यवसाय करण्याची मुभा आहे. त्यानंतर केवळ पार्सल सुविधा सुरु ठेवता येणार आहे. प्रत्यक्षात मात्र हॉटेल आणि बार व्यवसाय हा रात्रीच्या सुमारास होत असल्याने सध्या हॉटेल व्यवसायिक प्रचंड नुकसान सहन करीत आहेत.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com