बुलढाणा शिवसेनेकडून पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत

पूरग्रस्तांसाठी पंधराशे क्विंटल धान्य घेऊन 13 बसेस रवाना; पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी धान्य व किराणा साहित्याची मदत.
बुलढाणा शिवसेनेकडून पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत
बुलढाणा शिवसेनेकडून पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदतसंजय जाधव
Published On

बुलढाणा : कोरोनाच्या संकटानंतर राज्यावर पुन्हा एकदा ढगफुटी, आणि अतिवृष्टीचे मोठे संकट ओढवले आहे, यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह महाड व चिपळूण या ठिकाणी पावसाने आपले रौद्ररूप दाखवल्याने शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांचे संसार यामध्ये वाहून गेले आहेत.

अनेक गावे निसर्गाच्या प्रकोपामुळे नेस्तनाबूत झाली आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना धीर देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. याच सामाजिक भावनेतून नागरिकांना मदत नव्हे तर आपले कर्तव्य समजून शिवसेनेने मोठी मदत या पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पाठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला होणारा सर्व खर्च टाळून, राज्यातील शिवसैनिकांनी त्या पैशांची पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते आणि त्यानुसार हा मदतीचा हात दिला जात असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

हे देखील पहा -

बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एका दिवसात पंधराशे क्विंटल धान्य आणि किराणा साहित्य गोळा केले आहे. ज्यामध्ये गहू ,तांदूळ, आटा, डाळ, तेल, मीठ, यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंसह हे सर्व साहित्य 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे झाले असून शिवसैनिकांनी एकजुटीतून हि मदत जमवली आहे. हे सर्व साहित्य एसटी महामंडळाच्या 13 बसेसमध्ये भरून मेहकर येथून या बसेस रवाना झाल्या आहेत.

बुलढाणा शिवसेनेकडून पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ला आजपर्यंतचा विक्रमी दर !

यावेळी शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या बसेसना हिरवी झेंडा दाखवत या बसेस रवाना केल्या. यावेळी आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, जिल्हाध्यक्ष जालींदर बुधवत, नरेंद्र खेडेकर, यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही मदत गोळा केली आहे. ही मदत केवळ एका दिवसात शिवसैनिकांनी जमा केली असून, येत्या काही दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून देखील पुन्हा एकदा भरीव मदत पाठवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com