ZP School : ५ वर्गांवर एकच शिक्षक; संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकलं कुलूप, कुठे घडली घटना?

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ग्राम खळद येथे गेल्या कित्येक वर्षापासून एकच शिक्षक १ ते ५ पर्यंत वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे समोर आहे आहे
ZP School
ZP SchoolSaam tv
Published On

बुलढाणा : जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट झाली आहे. कुठे विद्यार्थी नाही तर कुठे शाळेवर शिक्षकच नाही; असे चित्र अनेक शाळांमध्ये पाहण्यास मिळते. अशाच प्रकारचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम खळद या गावातील पाचवीपर्यंत असलेल्या शाळेवर केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप ठोकले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ग्राम खळद येथे गेल्या कित्येक वर्षापासून एकच शिक्षक १ ते ५ पर्यंत वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे समोर आहे आहे. एक शिक्षक व वर्ग पाच अशी स्थिती असल्याने पालकांनी वारंवार याबाबतर जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र जिल्हा परिषदेकडून याबाबत कोणत्याही प्रकरणी दखल घेण्यात आली नाही. शाळेवर एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  

ZP School
Amravati Dengue Update : अमरावतीत डेंग्यूचा विळखा वाढला; जिल्ह्यात महिनाभरात आढळले १०० रुग्ण

शिक्षक मिळावा यासाठी केलेल्या तक्रारीचा काहीही फायदा झाला होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर आज शाळेत धडक देत शाळेलाच कुलूप ठोकले. जोपर्यंत शाळेवर जास्त शिक्षक मिळत नाही; तोपर्यंत कुलूप उघडले जाणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अशी परिस्थिती संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात आहे.. त्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com