धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला पकडत सोडले अभयारण्यात

धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला पकडत सोडले अभयारण्यात
Buldhana News
Buldhana NewsSaam tv

बुलढाणा : जिल्ह्याचा भौगोलिक वातावरण अस्वलासाठी पोषक असल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या उतरादा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका अस्वलाला बुलढाणा (Buldhana) वन विभागाच्या रेस्क्यू टीमने केमिकल (बेशुद्ध करून) रेस्क्यू करत अंबाबरवा अभयारण्यात सोडले आहे. (buldhana news wearing bear caught and released in the sanctuary)

Buldhana News
माकडाने गावात पसरविली दहशत; अनेकांना घेतला चावा

चिखली (Chikhali) तालुक्यातील व बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या उतरादा परिसरात चार दिवसा अगोदर एका शेतकऱ्यावर (Farmer) अस्वलाने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते. तसेच या परिसरात या अस्वलाने धुमाकूळ घातला होता. बुलढाणा आरएफओ पडोळ यांना माहिती मिळाली, की अस्वल दिवठाणा परिसरात ठाण मांडून बसलेला आहे. याची माहिती बुलढाणा डीएफओ अक्षय गजभिये तसेच एसीएफ रंजीत गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाची (Forest Department) रेस्क्यू टीमला सदर ठिकाणी पोहोचण्याचे निर्देश दिले.

वडनाला परिसरात सोडले

रेसक्यु टीम सर्व साहित्यासह घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष नर जातीच्या अस्वलाला ट्रेंक्युलाईज करून बेशुद्ध करण्यात आले. त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी अस्वलाची प्राथमीक तपासणी करून सुदृढ असल्याचे सागितल्याने बुलढाणा डीएफओ अक्षय गजभिये यांच्या आदेशाने या अस्वलाला बुलडाणा जिल्ह्यातील अंबाबारवा अभयरण्यातील चुणखडी वडनाला परिसरात सुखरूप सोडण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com