नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन केली दिवाळी; आमदार संजय गायकवाड यांची सह परिवार भेट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन केली दिवाळी; आमदार संजय गायकवाड यांची सह परिवार भेट
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSaam tv

बुलढाणा : दिवाळी उत्‍सव सर्वचजण उत्‍साहात साजरा करत असतात. दिवाळीनिमित्‍ताने फराळ, नवीन कपड्यांची खरेदी होत असते. परंतु, शेतातील पिकांचे नुकसान झाल्‍याने हवालदील झालेल्‍या बळीराजा (Farmer) संकटात असल्‍याने दिवाळी साजरी होवू शकत नाही. अशा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी सहपरिवार कुटूंबाला भेट देवून दिवाळी साजरी केली. (Breaking Marathi News)

MLA Sanjay Gaikwad
Balasaheb Thorat: सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस, शेतकऱ्यांना मदत नाही; बाळासाहेब थोरात यांचा आरोप
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSaam tv

बुलढाण्याचे (Buldhana) बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील संवेदनशीलपणा आज यानिमित्‍ताने दिसून आला. परतीच्या पावसाने (Rain) राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी पिके नेस्तनाबूत झाल्याने यंदाची दिवाळी (Diwali) शेतकऱ्यांसाठी दुःखाची ठरत आहे. अशातच संजय गायकवाड यांनी आपल्या धर्मपत्नी व मुलांसह बुलढाणा तालुक्यातील अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या गावात जाऊन शेतकऱ्यांच्या दिवाळी सणात सहभाग नोंदविला.

मुलांना कपडे, महिलांना साडीचोळी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरा करण्यासोबतच आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या लहान मुलांना फटाके, मिठाई, कपडे दिले. तसेच १०० महिलांना साडीचोळी भेट दिली. तर मिठाईच देखील वाटप केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com