तीन महिन्यांपासून गाव अंधारात; टावरवर चढत ग्रामस्‍थांचे आंदोलन

तीन महिन्यांपासून गाव अंधारात; टावरवर चढत ग्रामस्‍थांचे आंदोलन
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी हे गाव गेल्या तीन महिन्यापासून अंधारात आहे. याकडे विज वितरण कंपनीचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. ग्रामस्थांनी वारंवार विज वितरण कंपनीकडे तक्रारी निवेदन दिली. मात्र विज वितरण (MSEDCL) कंपनीला जाग आली नाही. शेवटी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेत गावातील मोबाईल टावरवर चढून शोले आंदोलन (Buldhana News) सुरु केले. (buldhana news no light for three months Movement of villagers climbing the tower)

Buldhana News
बसचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी; चरणमाळ घाटात अपघात

ढाल सावंगी गावात तीन फिडर आहेत. ते तीन महिन्यापूर्वी जळाले आहेत. ती बदलून देण्याची मागणी केली गेली. मात्र तेव्हापासून गाव अंधारात असल्याने नागरिक विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरीकांनी कार्यालयात अनेक चकरा मारल्‍या. परंतु, विज कंपनीने फिडर दुरूस्‍तीचे काम केले नाही. यामुळे गाव अंधारात गेले आहे.

आंदोलनाचा तिव्र इशारा

ढाल सावंगी गावातील नागरीकांनी आज टावरवर चढून शोले आंदोलन केले. यावेळी गावातील फिडर तातडीने सुरु करावे अशी मागणी केली. शिवाय दुरूस्‍ती केली नाही; तर यापेक्षा उग्र आंदोलन करू असा ईशारा आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com