Maratha Reservation : मनसे पदाधिकाऱ्याकडून तहसील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; मराठा आरक्षणासाठी झाले आक्रमक

Buldhana News : मनसे पदाधिकाऱ्याकडून तहसील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; मराठा आरक्षणासाठी झाले आक्रमक
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेले आंदोलन तीव्र झाले आहे. यात जालना येथील घटनेनंतर पडसाद अधिक तीव्र उमटत आहेत. याच दरम्यान मराठा आरक्षण मिळावे यासाठी (MNS) मनसे पदाधिकाऱ्यांकडून बुलढाणा (Buldhana) येथील तहसील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Maharashtra News)

Maratha Reservation
Nandurbar News: दुष्काळी परिस्थितीत भारनियमनाचा भार; पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

सध्या जालना येथील मराठा आरक्षण मिळावे; यासाठी आंदोलन सुरु आहे. दरम्यान आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडाराजा येथील तहसील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला. अचानक घडलेल्या या प्रकाराने तहसील कार्यालय (Jalna News) परिसरात खळबळ उडाली होती.  

Maratha Reservation
MSRTC Bus: एसटी सेवा कोलमडली; नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगाराचे ३३ लाखांचे नुकसान

पेट्रोलची बाटली घेऊन तहसीलमध्ये

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनसे विधानसभा प्रमुख सिद्धू गव्हाड हातात पेट्रोलची बाटली घेऊन तहसील कार्यालाट शिरले. यानंतर त्यांनी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी मनसे पदाधिकार्याला ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्याची बरीच गर्दी जमली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com