Buldhana News : पाणी शुद्धीकरण खोलीत चालतात दारूच्या पार्ट्या; बुलढाण्याच्या लोणी गवळी येथील धक्कादायक प्रकार

Buldhana : मेहेकर तालुक्यातील लोणी गवळी येथे ४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : गावातील पाणी पुरवठा चांगला करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम सुरु आहे. मात्र सदरचे काम अपूर्ण आहे. दरम्यान याठिकाणी बांधण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण खोलीत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. लोणी गवळी गावात असलेल्या या खोलीत दारूच्या बॉटल आढळून आल्या आहेत. यामुळे हे ठिकाण अवैध धंद्यांचा अड्डा बनला असल्याचे समोर आले आहे. 

जलजीवन मिशन योजनेंतर्गत बुलढाण्याच्या मेहेकर तालुक्यातील लोणी गवळी येथे ४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरी देखील सदरचे काम अर्धवट असून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी स्वतंत्र खोली बांधण्यात आली आहे. मात्र योजनेचे काम पूर्ण नसल्याचे या खोलीचा गैरवापर केला जात आहे. 

Buldhana News
Wardha News : खवल्या मांजरची दोन कोटीत डील; वन विभागाने तस्करी रोखली, सहा तस्करांना पुलगावातून अटक

खोलीत चालतात दारूच्या पार्ट्या 

जलशुद्धीकरण केंद्रासाठी बांधलेल्या खोलीचा वापर मात्र पाणी शुद्धीकरण करण्यासाठी न होता दारूच्या पार्ट्या साठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अर्धवट कामाच्या खोलीमध्ये देशी दारूच्या रिकाम्या बॉटल, बिसलेरी बॉटल व चखण्याचे साहित्य दिसून आल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च हा अवैध धंदे करण्यासाठी केला की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे. 

Buldhana News
Shahada Crime : दुकानातून लांबवीले दोन लाखांचे मोबाईल; शहादा शहरातील मध्यरात्रीची घटना

आला घालण्याची मागणी 

पाणी योजनेचे काम अपूर्ण असल्याने जलशुद्धीकरण करण्याच्या खोलीत सद्यस्थितीला गैरप्रकार होत आहे. दरम्यान अर्धवट कामामध्ये अवैध धंदे सुरू असल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देत या प्रकाराला आळा घालण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com