Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

Buldhana: ग्रामीण भागातील विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन आंदोलन...

आंदोलनात परिसरात अनेक भजनी मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बुलढाणा - मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने त्या रस्त्याची दुरस्ती तर निर्मिती करण्यात यावी यासाठी मेहेकर येथे सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांचे नेतृत्वात साखळी भजन आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात परिसरात अनेक भजनी मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे देखील पाहा -

मेहकर तालुक्यातील अनेक जोड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. शेतकरी कार्ड धारकांना बंद केलेले धान्य वाटप पुन्हा सुरू करण्यात यावे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, कुटुंब अर्थ साहाय्य योजना अंतर्गत दाखल प्रकरणे त्वरित मंजुर करण्यात यावे. स्व. गोपीनाथ मुंडें विमा योजनेचा प्रीमियम महाराष्ट्र सरकारने भरलेला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी विमा संरक्षणा पासून वंचित आहेत.

Buldhana News
बिहार सरकारचे भवितव्य आज ठरणार, तेजस्वी यादव यांनी आमदारांसाठी व्हीप केला जारी

या योजनेचा विमा हप्ता शासनाने तत्काळ भरावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50,000 अनुदान त्वरित मंजुर करुन खात्यात जमा करण्यात यावे. नवीन कार्ड धारकांना धान्य वाटप करण्यात यावे आदी मागण्या पुर्ण झाल्याशिवाय भजन आंदोलन स्थगित होणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com