Buldhana News: मृत्यूनंतरही यातना संपेना! स्मशानभूमीचा रस्ता अडवल्याने मृतदेह ठेवला रस्त्यावर अन्...

Buldhana Latest News : बुलडाणा जिल्ह्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचा आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत नेण्याचे ठराविले.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv

Buldhana News:

बुलडाणा जिल्ह्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचा आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत नेण्याचे ठराविले. मात्र, स्मशानभूमीत जाणारा सरकारी रस्त्यातच गावातील एका व्यक्तीने अडवून ठेवला. या आक्रमक ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यातच ठेवला. (Latest Marathi News)

स्मशानभूमीत जाण्याच्या रस्त्यात गावातील व्यक्तीने भिंत बांधली, लोखंडी गेट लावला. त्यामुळे ग्रामस्थांना अंत्यविधीला श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह नेता येत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीला रस्त्यातील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली.

Buldhana News
Shirur Crime : शेजारील घराला कुलूप लावून टाकला दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

गावातील व्यक्ती रस्त्यातील भिंत, लोखंडी गेट हटवण्यास तयार नसल्याने ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतक श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह रस्त्यातच ठेवला. त्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी एकच गोंधळ सुरु केला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. या घटनेने गावात तणावाचे वातावरण तयार झालं.

पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यविधी

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिखली तालुक्यातील धोडपं या गावातील संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ज्या व्यक्तीने अतिक्रमण करून गेट बनवून रस्ता अडवला होता. त्याच गेटसमोर म्हणजे रस्त्यातच मृतदेहावर अंत्यसंस्कार केला आहे. गावात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त आहे. तसेच गावात तणावपूर्ण शांतता आहे.

श्रीराम कोल्हे यांचा मृतदेहावर अंत्यविधी करताना शेकडो लोक जमले होते. महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहावर अग्नी दिल्याचे पाहायला मिळालं. या अंत्यविधीविषयी जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com