Baldness Virus
Baldness Virus News Saam Tv

Baldness Virus: टक्कल व्हायरस पसरतोय! रुग्ण संख्येत वाढ; ३ दिवसात ११ गावातील १०० जणांना पडलं टक्कल

Baldness Virus News : बुलढाण्यात टक्कल व्हायरसने नागरीक हैरान झाले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांचा संख्या वाढताना दिसत आहे. शेगाव तालुक्यातील अजून ११ गावाचा सर्व्हे करण्यात आला असून तेथे अजून रुग्ण आढळून आलेत.
Published on

संजय जाधव , साम प्रतिनिधी

टक्कल व्हायरसने बुलढाण्यात थैमान घातलं असून रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता परत शेगाव तालुक्यातील ११ गावातील १०० जणांना टक्कल पडल्याची घटना घडलीय. रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. केस गळतीच्या प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागले आहे. आज पुन्हा शेगाव तालुक्यातील काही गावांचा आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात आला. यात अजून १०० जण बाधित असल्याचं समोर आले आहे.

अचानक केस गळती होऊन तीन दिवसात टक्कल होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जिल्हा प्रशासन पाहिजे तशा पद्धतीच्या उपाय योजना करत नसल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.

या आजारामुळे केस गळती होऊन तीन दिवसात नागरिकांना टक्कल पडतं. लहान मुलं, महिलांसह पुरुषांनाही या नव्या व्हायरसची बाधा होतेय. त्यामुळे बुलढाण्यात भीतीचं वातावरण पसरले आहे. सुरुवातीलाच साडेचारशे लोकांना या आजाराची बाधा झाली होती. शेगावमधील पूर्णा नदीकाठच्या 15 गावात खळबळ उडालीय. आता आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील ११ गावात सर्व्हे करण्यात आला. यात नव्याने १०० जणांना टक्कल पडल्याचं आढळून आले आहे.

या टक्कल व्हायरसमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. तर आरोग्य विभागाकडून सर्व्हेक्षण करत केसांचे आणि त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. नागरिकांना टक्कल पडण्यामागे दूषित पाणी असल्याचही सांगण्यात येत आहे. दरम्यान जगभरात एचएमपीव्ही विषाणूने डोकं वर काढलं असताना राज्यात अशा प्रकारचा व्हायरस आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसलंय.

दरम्यान पूर्णा नदीकाठच्या परिसरातील दुषित पाण्यामुळे  अनेकांना किडनीच्या आजार उद्धवत आहे. परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा शासनाच्या अहवालातून सांगण्यात येत आहे. पूर्णा नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडची मात्रा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. पाण्यात फ्लोराईडची मात्रा जास्त असल्याने टक्कल पडत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com