अकोल्यात आयुक्तांच्या कार्यालयासमोर फोडले हांडे; पाण्यासाठी महिला आक्रमक

प्रभाग क्रमांक आठ मधील लहरिया नगर, नागेवाडी, वाघापुर या भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
अकोल्यात आयुक्तांच्या कार्यालयासमोर फोडले हांडे; पाण्यासाठी महिला आक्रमक
अकोल्यात आयुक्तांच्या कार्यालयासमोर फोडले हांडे; पाण्यासाठी महिला आक्रमकSaamTvNews

अकोला : अकोल्यातील प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांनी आज महापालिकेवर मोर्चा काढत मनपा आयुक्त यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महिला आक्रमक झाल्यावर त्या महिलांनी काढलेल्या मोर्चेमध्ये मनपा आयुक्त यांच्या कक्षासमोर घागर आणि हांडे फेकून रोष व्यक्त केला. सुरक्षारक्षकांनी महिलांना अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हे देखील पहा :

प्रभाग क्रमांक आठ मधील लहरिया नगर, नागेवाडी, वाघापुर या भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी पाईपलाईन नाही. त्यामुळे येथील महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे. दररोज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे. शेवटी आज त्यांनी घागर मोर्चा कडून महापालिकेवर आपला रोष व्यक्त केला. मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांना या संदर्भात निवेदन देण्यासाठी ते आले होते.

अकोल्यात आयुक्तांच्या कार्यालयासमोर फोडले हांडे; पाण्यासाठी महिला आक्रमक
यवतमाळ : शिवभोजन केंद्रातला किळसवाणा प्रकार, शौचालयात धुतली जात होती भांडी!

मात्र, त्यांचे ऐकून न घेता मनपा आयुक्त या निघून जात असल्याने त्या शेवटी संतप्त महिलांनी घागर व जवळील हांडे फेकून आपला रोष व्यक्त केला. त्यासोबतच मनपा आयुक्त यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी महिलांना बाजूला केल्यानंतर आयुक्तांना जाता आले. दरम्यान, या प्रकारानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com