बीड : फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी प्रतिवाहन पाचशेप्रमाणे चार वाहनांसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या वाहन निरीक्षकासह एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या एसीबीच्या कारवाईने आरटीओतील (RTO) लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
हे देखील पहा :
रविकिरण नागनाथ भड असे मोटार वाहन निरीक्षकाचे नाव असून प्रवीण सीताराम गायकवाड हा खासगी एजंट आहे. दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजीचे हे प्रकरण आहे. एका व्यक्तीच्या चार वाहनांच्या फिटनेस (योग्यता) प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी ५०० रुपये लाचेची मागणी वाहन निरीक्षक रविकरण भड याने एजंट प्रवीण गायकवाडमार्फत केली होती.
त्याच दिवशी एसीबीकडे (ACB) तक्रार दिली. त्यानुसार तक्रारदारास सोबत घेऊन लाच मागणी पडताळणी केली असता वाहन निरीक्षक भड याने लाचेची रक्कम एजंट गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितले. दरम्यान, त्यानंतर दोनवेळा सापळा लावला, पण संशय आल्याने वाहन निरीक्षक भड याने लाच स्वीकारली नाही. त्यामुळे बीड (Beed) ग्रामीण पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद झालाय.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.