Breaking ! राज्यसरकारकडून पूरग्रस्तांसाठी ११५०० कोटींच्या निधीला मान्यता

राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे, दरडी कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Breaking ! राज्यसरकारकडून पूरग्रस्तांसाठी ११५०० कोटींच्या निधीला मान्यता
Breaking ! राज्यसरकारकडून पूरग्रस्तांसाठी ११५०० कोटींच्या निधीला मान्यता Saam tv news
Published On

राज्यभरात अतिवृष्टी, पुरामुळे, दरडी कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यसरकारने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली (Breaking! State government approves Rs 11,500 crore fund for flood victims)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

- ११ हजार ५०० रुपयांचे पॅकेज

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमूळे महापुराचे संकट ओढावले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावेच्या गावे उद्धवस्त झाली. अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी तातडीची, दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी राज्यसरकारने ११ हजार ५०० रुपये आपण पॅकेज जाहीर केलं आहे.

Breaking ! राज्यसरकारकडून पूरग्रस्तांसाठी ११५०० कोटींच्या निधीला मान्यता
कोकणातील 30 लहान मोठ्या नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार

- तळीये गाव आणि वाड्यांचे म्हाडामार्फत होणार पुनर्वसन

तळीय़े गाव आणि शेजारील ४ वाड्यांचा राज्य सरकार म्हाडाच्या माध्यातून पुनर्वसन करणार. एका घरासाठी साडे चार लाख खर्च केला जाणार असून त्यासाठी जागा देखील निश्चित केली आहे. दीड लाख रुपये मदत आणि पुनर्वसन विभाग देणार. धोकादायक परिस्थिती असलेल्या गावांची यादी तयार करून एक धोरण तयार केलं जाईल, त्या गावांच्या पुनर्विकास केला जाईल. या नैसर्गिक आपत्तीत ४ हजार ५०० पेक्षा अधिक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. प्राण्यांच्या मृत्यूबाबतीत निकषांच्या पलीकडे जाऊन मदत केली जाईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

- वित्तीय नुकसान

तर, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वित्तीय नुकनीची माहिती देताना सांगितले की, पंचनामे अजून पु्र्ण झाले नाहीत. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यात ८०% माहिती आली. अजून काही पंचनामे व्हायचे आहेत. घर पूर्ण पडलं असल्यास १ लाख ५० हजार रुपये आणि अर्ध घर पडलं असल्यास ५० हजार मदत दिली जाणार. तर घराचं कमी पण काही प्रमाणात नुकसान झालं असल्यास १५ हजार रुपये मदत देणार. ४ लाख हेक्टर शेतीच नुकसान झालंय. दुकानदारांना ५० हजार रुपयर मदत आपण देणार आहोत. यावेळी मदत ही चेक ने दिली जाणार आहे ,

- मदत थेट खात्यावर जमा करणार

आज मदत जाहीर केली आहे. पण रोख रक्कम देणार नाही. उद्यापासून मदत थेट खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. पण गरज लागली तर आणखी मदत वाढवून दिली जाईल, पॅकेजमध्ये पैसे आणखी वाढवले जातील. त्याचबरोबर आम्ही आढावा पूर्ण झाल्यावर केंद्राकडेही मदतीसाठी पत्र पठाऊ, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com