Maratha Aarakshan News: ब्रेकिंग! मराठा आंदोलनाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; ३ महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना

Maratha Reservation News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी राज्य सरकारने दिले SIT नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam Digital
Published On

SIT Established For Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनांसंदर्भात महत्वाची बातमी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीला तीन महिन्यात अहवाल सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Manoj Jarange Patil
Amravati News: कमानीचा वाद, दगडफेक आणि लाठीचार्ज; अमरावतीत काय घडलं?

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावेळी अनेक भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. सभागृहात हा मुद्दा गाजल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार आता राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिके यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठीत करण्यात आली आहे. तसेच या समितीला तीन महिन्यात अहवाल सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकचे पोलीस आयुक्त संदी कर्णिक हे या एसआयटीचे प्रमुख असतील. यामध्ये या आंदोलनादरम्यान हिंसक घटनांमागे कोण आहे? सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला का? चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या गेल्या का? याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच SIT ला तज्ञांना आमंत्रित करण्याचे आणि आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil
Rohit Pawar News: मला जेलमध्ये टाकू शकतात, रोहित पवारांना भीती; शरद पवारांनाही चिंता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com