
आपल्याला पैसे मिळण्याचा काळ आता संपलेला आहे. आपले रक्कम आता पाच सहा हजार कोटी राहिली आहे. ते पण रक्कम आता मिळेल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. एवढं सांगेन.. या सकाळपासून माझ्या कामात आहे उद्या पंतप्रधान नाशिक मध्ये येत आहेत... इथून गेल्यानंतर मी माझ्या पद्धतीने सीपीना सूचना देईल.
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतिक्षा रामेश्वर जायभाये हिच्या हस्ते जिजाऊंना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत.
नवी मुंबई येथे दुपारी 4:15 च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील
छत्रपती संभाजी नगर :
मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
जरांगे पाटील इथून थेट अंतरवाली सराटीमध्ये जाणार
उद्या बीड-जालना दौरा करणार, त्यानंतर मुंबईची तयारी
मनोज जरांगे पाटील यांच्या पायाच्या बोटाला झाली होती जखम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांना नाशिक पोलिसांनी बजावल्या नोटीस नरेंद्र मोदींचे उद्या नाशिकमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांची विशेष खबरदारी
शिक्षण आयुक्त कार्यालयात अडवली कार
शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमांचे स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची आंदोलक विद्यार्थांची मागणी
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी
व्हीआयपी कॉन्व्हे रिबर्सल सुरू असल्याने वाहतूक कोंडी
दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी
सारथी, महाज्योती, बार्टी प्रवेश परीक्षा स्थगित
काल १० जानेवारी रोजी परीक्षेत प्रश्नसंच सी आणि डी सीलबंद नसल्याने परीक्षेत गैरकारभार
परीक्षेला स्थगिती दिली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक जारी
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला अन्यायी निकाल ठाकरे गटाचे नेते जनतेपर्यंत पोहचवणार
आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर चर्चा झाली
या कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असून या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यत निकाल पोहचवण्याचे ध्येय आहे
26 जानेवारीपासून नेत्यांचे पुढील दौरे सुरू होणार आहेत
केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर केला. यात एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेले सासवड शहर देशातली सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले आहे. तर एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राची नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असून या महाराष्ट्र या सर्वेक्षणात पहिल्यां नंबरवर आहे.
नोएडा, गुरूग्राम भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवले.
सुनील केदार यांच्यासह साधारण १०० समर्थकांवर गुन्हे दाखल, तीन वाहने पोलिसांनी केली जप्त
कार्यकर्त्यांना सूचना करूनही रॅली काढण्यात आली. त्यामुळे याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कारागृहाबाहेर प्रतिबंधात्मक क्षेत्र असताना आणि नोटीस बजावली असतानाही रॅली काढल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता
१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार - सूत्र
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार
त्यापूर्वी ३१ जानेवारीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीच्या नाशिक दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या नियोजनासाठी स्वतः मुख्यमंत्री नाशिकमध्ये करणार दुसऱ्यांदा पाहणी
तर फडणवीस देखील घेणार मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा
उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रोड शो
राम मंदिर दर्शन, गोदा पूजन असे भरगच्च कार्यक्रम
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची याचिका
विशेष एनआयए कोर्टात दाखल केली याचिका
सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना केला आहे जामीन मंजूर
NIA कोर्टात सुनावणी सुरू
तलाठी भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करतानाच एसआयटी चौकशी करण्यात यावी आणि एमपीएससी 2024 जाहिरातीत सर्व संवर्गातील जागा वाढवाव्यात, या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाला आहे. पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊ नका असे आवाहन केले; मात्र त्यानंतरही आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दुपारी दोन तासांसाठी वाहतूक बंद राहणार
दुपारी 1.30 ते 3.30 वाजताच्या दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार
पळस्पे हद्दीत सर्विसेबल गँट्री बसविण्याच्या नियोजित कामासाठी ब्लॉक
सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहनचालकांना आवाहन
पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलके वाहने आणि बस खोपोली एक्झिट येथून वळवून खोपोली शहरातून जुना-पुणे मुंबई महामार्गावरून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईकडे येणार
जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
प्रभू श्रीराम यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या
ठाण्यातील महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड आणि विरुद्ध दाखल केला गुन्हा
प्रभु श्रीराम शाकाहारी नव्हते मांसाहारी होते असे विधान केले होते
जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं विधान हे अपमानजनक असून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या आहेत, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे
नवाब मलिकांना वैद्यकिय जामीन ६ महिन्यांसाठी मंजूर
सुप्रीम कोर्टाकडून मुदत वाढ
पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात
सभेला संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राष्ट्रीय साखर कारखाना अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थितीत
या सर्वसाधारण सभेला अजित पवार यांची दांडी
अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर येणे टाळले
पंढरपूर येथील जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संदर्भात दिलेले निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फाडून आंदोलकांचा अपमान केला आहे, असा आरोप जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केला आहे.
या घटनेचा निषेध म्हणून जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करून मंत्री पाटील यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड गावातील शेतकरी यशवंत कुलकर्णी यांच्या आखाड्यावरून, अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेले. 7 जानेवारी रोजी रात्री 8 ते पहाटेच्या वेळेत ही घटना घडलीय. याप्रकरणी गुलाब उत्तमराव मोरे यांच्या फिर्यादीवरून बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद मोहोळ चा "देशभक्त" म्हणून उल्लेख
शरद मोहोळ याच्या श्रदांजली प्रती पुण्यात धनकवडी भागात फ्लेक्सबाजी
फ्लेक्सवर शरद मोहोळ याचा देशभक्त म्हणून उल्लेख
५ जानेवारी रोजी शरद मोहोळ ची त्याच्याच जवळच्या काही लोकांनी त्याचा खून केला होता
भाजप नेते नितेश राणे यांनी शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली होती आणि त्यांनी शरद मोहोळ चे हिंदुत्वासाठी मोठे योगदान आहे
या विधानानंतर आता पुण्यात शरद मोहोळ याचे देशभक्त म्हणून उल्लेख केलेले फ्लेक्स पाहायला मिळत आहेत
पाच राज्यात जागा द्या, आम आदमी पक्षाची कॉंग्रेसकडे मागणी
आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली
या बैठकीला कॉंग्रेसच्या वतीने मुकुल वासनिक, अशोक गहलोत, मोहन प्रकाश आणि सलमान खुर्शीद उपस्थित होते. तर आपच्या वतीने संदीप पाठक, आतिशी आणि सौरभ भारद्वाज उपस्थित होते
या बैठकीनंतर चर्चा सकारात्मक राहिली असं दोनही पक्षाचं म्हणणं
मात्र, आपने पाच राज्यात जागा मागितल्यानं दोनही पक्षात बातचीत पुढं कशी जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे
आपने पंजाब, दिल्ली, गुजरात, गोवा आणि हरियाणा या राज्यात जागांची केली मागणी
लोकसभेच्या एकूण 59 जागा असलेल्या या 5 राज्यात आपने कॉंग्रेसकडे जागा मागितल्या
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.