Today's Marathi News Live: अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

Maharashtra Latest News and Update in Marathi (21 March 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
21 March 2024 Maharashtra's Live Marathi Batmya | Latest News on Mahavikas Aghadi Seat Sharing, Loksabha Election 2024 | Saam TV
21 March 2024 Maharashtra's Live Marathi Batmya | Latest News on Mahavikas Aghadi Seat Sharing, Loksabha Election 2024 | Saam TVSaam Tv

अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर 

अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस कडून साजिद खान पठाण यांना उमेदवारी

ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर कलम १४४ लागू

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले आहेत.

केंद्र सरकारविरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

जो माणूस कुस्ती खेळतो, तो मातीशी बेईमानी करणार नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे सांगलीत काय म्हणाले?

जो माणूस कुस्ती खेळतो, तो मातीशी बेमान करणार नाही. आमची काही गेले ते खाऊन खाऊन गेली. शिवसेनेने मोठं केलं, यांना लाज नाही. आज मुख्यमंत्री आहेत, त्यांची ओळख तरी होती का? त्यांनी आज त्यांच्या आमदारांना दम दिला. सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. पण झाडाखाली पोपट घेऊन बसण्याची वेळ आली आहे.

अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात धाव

ईडीचे पथक घरी दाखल झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात धाव

अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येवू नये अशी मागणी

सर्वोच्च न्यायालयासमोर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी केजरीवाल यांचा प्रयत्न

उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सामूहिक : शरद पवार

शरद पवार काय म्हणाले?

लोकशाहीमध्ये निवडणूक महत्वाची

अशा लोकांच्या हातात सत्ता देईल, त्यांनी कामे केली पाहिजे.

संघटना जोरावर सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्न केले पाहिजे.

समाज लहान असून विखुरलेले आहे .त्यासाठी त्यांचे प्रश्न आमचे प्रयत्न.

जे व्यासपीठ कराल, त्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

उपेक्षित समाजाची प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सामूहिक आहे.

काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगात

काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगात

सरकारी जाहिराती थांबवण्याची मागणी

मोदींची गॅरंटी, विकसीत भारत, मोदींचा परिवार या जाहिरातींवर आक्षेप

निवडणूक आयोगाला पत्र देत कारवाई करण्याची मागणी

पिंपरी चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग

पिंपरी चिंचवडमधील त्रिवेणी नगर या ठिकाणी एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे.

सजावट वस्तूंच्या गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे बारा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मी २४ तास उपलब्ध, तुम्हीही राहा; मुख्यमंत्र्यांकडून पदाधिकाऱ्यांना संदेश

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मी २४ तास उपलब्ध असतो, तुम्हीही रहा

शिवसैनिक फायरब्रॅन्ड आहे.

राजस्थानमधील आमदार महिलेने पक्षात प्रवेश केलाय. त्यांच्या पाठोपाठ झारखंड, एमपी, येथूनही सात ते आठ जण येणार आहेत.

मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी

शिवाजी पार्क येथील मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी

9 एप्रिलला शिवाजी पार्कमध्ये मनसेचा पाडवा मेळावा

लोकसभा निवडणुकीचा पार्श्भूमीवर मनसेसाठी सभा महत्त्वाची

मनसे महायुती जाणार असल्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष

शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कोल्हापुरातील पॅलेसवर ठाकरेंची शाहू महाराजांची भेट

शाहू महाराजाचे आशीर्वाद घेतले.

शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही.

महाराजांच्या प्रचाराला, विजयी सभेला येणार

शाहू कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांचे ऋणानुबंध

पक्षाने सांगितले तर राज्यात प्रचार करणार : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

भाजप मित्र पक्षाबाबत कोअर कमिटी काम करत आहे.

मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर नक्की काम करेल.

मी आधीच हुशार आहे.

राज्याचे नेते मित्र पक्ष जानकर यांना व्यवस्थित हाताळतील.

वसईत खेळणी बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी

वसईत खेळणी बनविणाऱ्या शैलेश इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागली आहे. आज गुरुवारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.

आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाची केंद्र सरकारला नोटीस

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही विकसित भारतचे मेसेज येत असल्याने निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. हा आदर्श अचारसिंहितेचा भंग असल्याने असे मेसेज पाठवू नयेत, असे यामध्ये म्हटले आहे. हे मेसेज येत असल्याने विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली होती.

उमेदवार बदलणार नाही; भाजप हायकमांड रणजित निंबाळकरांच्या नावावर ठाम!

माढा मतदारसंघ आणि उमेदवार बदलण्याची शक्यता नसल्याची भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सातारा आणि माढा दोन्ही मतदार संघ भाजप लढणार असून सातारा ऐवजी राष्ट्रवादीला दुसरा मतदारसंघ देण्याचा विचार असल्याचेही सांगितले जात आहे.

Amravati News: अमरावतीची जागा शिवसनेची, त्या जागेवर दावा कायम - आनंदराव अडसूळ

अमरावतीची जागा ही शिवसनेची आहे. आमचा त्या जागेवरचा दावा कायम आहे, असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं.

युतीत ती जागा आम्ही लढवत होतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णयात ते अपात्र ठरण्याची शक्यता असताना फडणवीस यांनी तशी प्रतिक्रिया कशी दिला आम्हाला पडलेला प्रश्न आहे

मात्र मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय

निवडणुकीत आम्ही प्रचार करायचा ही नाही हे नंतर ठरवू- आनंदराव अडसूळ

राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली

राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली

मुंबईच्या वांद्रे ताज लँड हॉटेलमध्ये मागील तासाभरापासून सुरू होती बैठक

Raj Thackeray: मुंबईत राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक

मुंबईत राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक

दिल्लीत अमित शाह यांच्योसोबच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला, मिरजेतील आजच्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला, मिरजेतील आजच्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात आलं होतं निमंत्रण, मात्र काँग्रेसकडून निमंत्रण नाकारले

जागेचा तिढा असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भूमिका

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्वीकारलं निमंत्रण

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहणार मेळाव्याला उपस्थित

बाळासाहेब थोरात यांच्या हातात राज्यातील सर्व सूत्र देणे परवडणारे नाही,  काँग्रेसच्या काही नेत्यांची दिल्लीत तक्रार

बाळासाहेब थोरात यांच्या हातात राज्यातील सर्व सूत्र देणे परवडणारे नाही

काँग्रेसच्या काही नेत्यांची दिल्लीत तक्रार

सत्यजित तांबे प्रकरणातली थोरातांची भूमिका तसंच पवारांची जवळीक अशी दिली कारणे

पटोले आणि वड्डेटीवार यांना राज्याच्या राजकारणात ठेवावे असा काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती

भाजप खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल

भाजप खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली - सूत्र

साताऱ्याच्या जागेवरून लढण्यासाठी उदयनराजे इच्छुक

मात्र सातारा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांनी घड्याळ चिन्हावर लढावं अशी इच्छा

उदयनरजे मात्र भाजपच्या कमल चिन्हावर लढण्यावर ठाम, सूत्रांची माहिती

आमदार रवी राणा घेणार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार रवी राणा घेणार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

महायुतीमध्ये अमरावती लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा कायम

अमरावतीच्या महायुतीचा उमेदवार भाजपचाच असेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर

नवनीत राणा भाजपामध्ये  प्रवेश करून भाजपाची तिकीट घेणार का याकडे सर्वांचे लक्ष

रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ

रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक (संभाव्य) उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ

जात वैधता प्रमाणपत्राबाबत काँग्रेसच्या रश्मी बर्वे उर्फ रिना सोनेकर यांना नोटीस

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून रश्मी बर्वे यांना नोटीस

हिंगोलीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल

हिंगोलीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल

रेल्वे स्थानकावर देशाच्या पंतप्रधानांचे पोस्टर आढळले

निवडणूक अधिकाऱ्यांनी स्टेशन मास्टरविरोधात गुन्हा दाखल केला

तर हिंगोलीच्या इंद्रा चौक मार्केटमध्ये दुकानावर शिवसेनेचे पोस्टर लावल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

अमरावतीत आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा दाखल

आचारसंहिता भंग केल्याचा अमरावतीत पहिला गुन्हा दाखल

अमरावतीच्या राजापेठ पोलिसात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

शासनाचा परवानगी न घेता नियम धाब्यावर बसवून अमरावतीच्या ओसलवाल भवनात घेतला महिलांच्या हळदी कुंकवाचा मेळावा

हळदी कुंकवाच्या मेळाव्यात 200 पेक्षा अधिक महिलांचा सहभाग, महिलांना वाटल्या भेटवस्तू

युवा स्वाभिन पक्षाचे पदाधिकारी सूरज मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

राज ठाकरे यांची दिल्लीवारी झाल्यानंतर आज शिवतीर्थावर 11 वाजता नेत्यांची बैठक

राज ठाकरे यांची दिल्लीवारी झाल्यानंतर आज शिवतीर्थ निवासस्थानी 11 वाजता नेत्यांची बैठक

बैठकीला नेते पदाधिकारी उपस्थित राहणार

दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे नेत्यांशी आज चर्चा करणार असल्याची माहिती

तसेच दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा असणार आहे, याची देखील चर्चा या बैठकीत होणार आहे

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडी पुढे गाजरं टाकून मराठा समाजाचे आंदोलन

पंढरपूर येथे प्रचार दौऱ्यावर असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथे आले असता रात्री येथील‌ मराठा समाजाच्या तरुणांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडी पुढे गाजरं आणि टोमॅटो टाकून गावात बैठक घेण्यास विरोध केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात येण्यास नेत्यांना‌ बंदी घातली आहे. बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे, असा जाबही स्थानिक मराठा समाजाच्या तरूणांनी विचारला.लदरम्यान धैर्यशील पाटील यांनी गावात बैठक न घेता पुढे निघून गेले.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर होणार?

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर होणार?

महाविकास आघाडीची आज सिल्व्हर ओकवर बैठक

सकाळी 10 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

बैठकीला ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील उपस्थित राहणार

आजच्या बैठकीचं निमंत्रण वंचितला देण्यात आलं की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com