Breaking News Live Updates : राज ठाकरेंची पुन्हा टोलधाड; रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी फोडली

Maharashtra Latest News Updates : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Breaking Marathi News Live Updates (2 February 2024) on Maratha Aarakashan, Manoj Jarange Patil
Breaking Marathi News Live Updates (2 February 2024) on Maratha Aarakashan, Manoj Jarange PatilSaam TV

राज ठाकरेंची पुन्हा टोलधाड; रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी फोडली

ठाणे - मुलुंड टेालनाक्यावर राज ठाकरे यांची पुन्हा टेालधाड पाहायला मिळाली. आज शुक्रवारी पुन्हा अडकलेली वाहतूक कोंडी फोडली.

मनोज पाटील जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने जरांगे च्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलीसांचा बंदोबस्त.

सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आलीत.

नाशिकच्या सिन्नरमध्ये कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचे प्रचंड लोट

- सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कंपनीला भीषण आग

- आदिमा ऑरगॅनिक्स कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचे प्रचंड लोट

- आगीचं कारण अद्याप स्पष्ट

- माळेगाव एमआयडीसी, सिन्नर नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी रवाना

- नाशिकहून देखील अग्निशमन दलाला पाचारण

- कंपनीत कुणी कामगार अडकलेत का? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही

मुंबईकरांसाठी काही नवीन योजना बजेटमध्ये नाही; काँग्रेसची टीका

काँग्रेस नेते रवी राजा यांनी मुंबई महापालिकेच्या बजेटवर टीका केली आहे. ' मुंबईकरांसाठी काही नवीन योजना या बजेटमध्ये नाही. महानगरपालिकेच्या प्रशासकांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही संकल्प दिसत नाही. बजेटमध्ये दोन लाख कोटींची कामे दाखवण्यात आली आहेत. मात्र बजेटमध्ये पैसे कुठे आहेत, असा सवाल करत रवी राजा यांनी टीका केली आहे.

वंचित अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही; प्रकाश आंबेडकरांची माहिती

आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि सेनेसोबत, प्रकाश आंबेडकरांची माहिती

पुढील आठवड्यात कॅंाग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होणार

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार : कोर्ट

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्ञानवापीच्या तळघरात पूजेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. न्यायालयाने ज्ञानवापी मशीद कमिटीला कोणताही दिलासा नाही.

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचे मुभा देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते. त्या विरोधात मशीद कमिटी उच्च न्यायालयात अपीलात आली होती. उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे. राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था पहावी, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

कोस्टर रोडच्या पहिल्या टप्प्याचं १९ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार

कोस्टर रोडच्या पहिल्या टप्प्याचं १९ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन होणार

वरळी ते मरीन ड्राईव्ह १० किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण होणार

१५ मेपर्यंत दोन्ही टप्पे सुरु होणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती

संभाजीराजेंचं ठरलं, लोकसभेला कोल्हापूरमधूनच रिंगणात उतरणार

संभाजीराजेंचं ठरलं, लोकसभेला कोल्हापूरमधूनच रिंगणात उतरणार

नाशिक की कोल्हापूर या चर्चांना पूर्णविराम

उद्यापासून मतदारसंघांचा संभाजीराजे दौरा सुरू करणार

स्वत:च्या स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम

महविकास आघाडीकडून घटक पक्षात प्रवेश करण्याची अट संभाजीराजेंनी केली अमान्य

महविकास आघाडीची होणार कोंडी

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ED कोठडी

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ED कोठडी

न्यायालयाने 5 दिवसांची ED कोठडी सुनावली

31 जानेवारीला ED ने सोरेन यांना केली होती अटक

विरार पोलिसांकडून १० किलो गांजा जप्त

विरार पोलिसांकडून १० किलो गांजा जप्त

विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

विरार पूर्वेच्या चंदनसार नाक्यावर एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती

बाजारभावाप्रमाणे १० किलो गांजाची किंमत दोन लाख रुपये

आरोपी विकास मौर्याला अटक

प्रकाश आंबेडकरांचा 6 जागांचा प्रस्ताव ठरला

प्रकाश आंबेडकरांचा 6 जागांचा प्रस्ताव ठरला

अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, बुलडाणा,अमरावती जागांचा समावेश

महाविकास आघाडीच्या बैठकीआधी राजगृहवर बैठकीत नेत्यांचं ठरलं

आघाडीच्या बैठकीत 12+12+12+12 च्या फॉर्मुला वर पाणी सोडणार?

राज्यसभेसाठी महायुतीकडून सहाही जागांसाठी चाचपणी सुरु

राज्यसभेच्या अनुषंगाने भाजपची खलबतं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांची जे पी नड्डा यांच्याशी दीर्घ चर्चा

भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत चौथा उमेदवार टाकण्याची शक्यता

राज्यसभेसाठी महायुतीकडून सहाही जागांसाठी चाचपणी सुरु

पुणे लोकसभेसाठी मनसेकडून ५ नावे चर्चेत, राज ठाकरेंना दिला नावांचा अहवाल

पुणे लोकसभेसाठी मनसेची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नाव राज ठाकरेंना पुणे शहर मनसेकडून कळवली

लोकसभा प्रभारींनी राज ठाकरेंना दिला नावांचा अहवाल

पुण्यातून ५ जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक

पुणे लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी वसंत मोरे,साईनाथ बाबर, बाबू वागसकर,किशोर शिंदे,गणेश सातपुते,यांच्या नावाचा समावेश

पुणे-सोलापूर महामार्गवर अपघात, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गवर अपघात

रस्ता ओलांडून जाणाऱ्या तरुणाला दुचाकीची धडक

तरुण जखमी तर दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

७ फेब्रुवारी पासून रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मानधन वाढ, वसतिगृहाची दुराव्यस्था, प्रलंबित भत्ते, याविषयी अनेक वेळा पत्र देऊनही दाद न देणाऱ्या यंत्रणेवरुन डाॅक्टर आक्रमक

या संपात राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयातील डाॅक्टर संपावर जाणार

कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळच्या जीवाला धोका

कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे पुरवणी जबाबात सांगितले

गुन्ह्यासंबंधीचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर

मोहोळ खून प्रकरणातील फरारी मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी बुधवारी रात्री पाठलाग करून संगमनेरजवळून अटक केली आहे. त्याला काल विशेष मोक्का न्यायालयात हजर केले

त्यावेळी पोलिसांनी गोपनीय अहवाल सादर करत गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयात दिली

नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांवरील आयकर विभागाची कारवाई सुरूच

नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांवरील आयकर विभागाची कारवाई सुरूच

शहरातील ८ बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांच्या घर, कार्यालय आणि कंपन्यांमध्ये आयकर विभागाची चौकशी

ठेकेदारांच्या बँक खाते आणि लॉकरची देखील तपासणी

मिळालेली कागदपत्रं आणि रोख रक्कमेची कसून चौकशी

चौकशीत ठेकेदारांच्या संपर्कातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांची नावं समोर आल्याची सूत्रांची माहिती

आजी माजी लोकप्रतिनिधींच्या पत्रावर मोठी टक्केवारी घेत कामं घेतल्याची तसच ठेकेदारांनी डमी कंपन्यांना कामं दिल्याची माहिती तपासात समोर

आयकर विभागाच्या पुढील कारवाईकडे लक्ष

अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी 14 फेब्रुवारीपासून जाणार पुन्हा बेमुदत संपावर

अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी 14 फेब्रुवारीपासून जाणार पुन्हा बेमुदत संपावर

महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने कामगार संघ आक्रमक

यापूर्वी कामगारांनी आंदोलन केले असताना आश्वासन देऊन सोडले होते महानगरपालिकेने आंदोलने

महानगरपालिकेने दिलेले आश्वासने पूर्ण न केल्याने कर्मचारी जाणार संपावर

शहापूरमध्ये शिक्षक नसल्याने पालकांचं शाळेला टाळे ठोकून शाळा बंद आंदोलन

ठाणे : शहापूर तालुक्यातील साकडबाव व जिल्हा परिषद शाळेवर शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक न दिल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकून शाळा बंद आंदोलन केले

26 जानेवारी रोजी पालकांची बैठक घेऊन 31 जानेवारीपर्यंत शिक्षक न दिल्यास शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता

त्यानुसार पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी यांनी तात्पुरता स्वरूपात एका शिक्षकाची नेमणूक केली होती, मात्र शिक्षक हजरच झाला नसल्याने अखेर संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकू शाळा बंद आंदोलन केले

उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी ठाकरे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत

रत्नागिरी - उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत

खेड - दापोली - मंडणगड या विधानसभा मतदारसंघातील भाजपचे काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती

स्थानिक पातळी अंतर्गत राजकारणामुळे भाजपचे पदाधिकारी वेगळी वाट निवडण्याची शक्यता

पनवेलमधील पाणी प्रश्न मिटणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पनवेल मनपा क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पाताळगंगा नदीतून तातडीने प्रतिदिन १० दशलक्ष लिटर पाणी व कायमस्वरूपी उपाय म्हणून डोलवाल बंधाऱ्यातून प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर पाणी आरक्षणाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे पनवेलमधील पाणी प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी व्यक्त केला.

मुंबईतील चेंबूर परिसरात एका घरात सिलेंडरचा स्फोट, ७ जण जखमी

मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीत काल रात्री एका घरात सिलेंडरचा स्फोट

दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी

सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात केले दाखल

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही

अरविंद केजरीवाल आजही चौकशीला हजर राहणार नाहीत - सूत्र

अरविंद केजरीवाल आजही चौकशीला हजर राहणार नाहीत - सूत्र

माझ्या प्रश्नांची उत्तर ED ने दिल्यानंतर मी चौकशीला जाणार, केजरीवालांची भूमिका

आजही केजरीवाल ED ला पत्र लिहिण्याची शक्यता

महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत आज पुन्हा एकदा बैठक, अंतिम निर्णय होण्याची शक्यता

महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत आज पुन्हा एकदा बैठक

सकाळी 11 वाजता मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये होणार बैठक

आज जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

आजच्या बैठकीला वंचितकडून प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार

वंचितकडून आज जागावाटपाबाबत त्यांची भूमिका मांडली जाणार

मविआचा 40 जागांबाबत निर्णय झाल्याची माहिती

8 जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता

आज जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेणार

ठाकरे गटाकडून संजय राऊत, काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com