Today's Marathi News Live: बेरोजगारी, महागाई, हुकूमशाहीविरोधात यात्रा काढली; राहुल गांधींनी सांगितला भारत जोडो न्याय यात्रेचा उद्देश

Maharashtra Latest News and Update in Marathi (17 March 2024) : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त आढावा.
Breaking in Marathi 17 March 2024 Latest News on Mahayuti Mahavikas Aghadi Seat Sharing, Loksabha Election 2024 Rahul gandhi in mumbai Bharat Jodo Nyay Yatra political news
Breaking in Marathi 17 March 2024 Latest News on Mahayuti Mahavikas Aghadi Seat Sharing, Loksabha Election 2024 Rahul gandhi in mumbai Bharat Jodo Nyay Yatra political newsSaam Tv
Published On

बेरोजगारी, महागाई, हुकूमशाहीविरोधात यात्रा काढली; राहुल गांधींनी सांगितला भारत जोडो न्याय यात्रेचा उद्देश

धारावी ही कला आणि कुशलतेची राजधानी

त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे खुले करा, धारावीचा कायापालट होईल

ईव्हीएमशिवाय भाजप निवडणूक जिंकू शकत नाही

हुकूमशाही तडीपार करण्याचं काम करायचं आहे; शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बंधू भगिनींनो मातांनो....

जसं पवार साहेब म्हणाले हीच ती मुंबई आहे जिथून महात्मा गांधींनी 42 साली इंग्रजांना चले जाव सांगितलं होतं

तसाच आपण मुंबईतून या हुकूमशाही तडीपार करण्याचं काम करायचं आहे

खरंतर हा फुगा आहे पण, वाईट वाटतं की या फुग्यात हवा भरण्याच काम आम्हीच केलंय

400 पार म्हणे... काय फर्निचर दुकान आहे?

मोदी म्हणाले होते की ही विरोधी पक्षांची मीटिंग आहे... हो जरूर विरोधी पक्षाची मीटिंग आहे

म्हणे मोदी सरकार... तुमच्या देशात काय माझ्या देशाचं नाव बदलण्याचं आहे का?

ते म्हणतात विरोधी पक्ष 29 मध्ये अडकलाय पण मी 2047 बद्दल बोलतोय...

मी म्हणतोय अबकी बार भाजप तडीपार... आणि त्याची सुरुवात आज झाली

शिवतीर्थावरून झेव्हा सुरुवात होते .. मुंबईतून एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा ती गोष्ट देशभरात पोहोचते

ज्या कंपन्याचं प्रॉफिट २०० कोटी, त्यांनी १३०० कोटीचे बाँड्स कसे दिले; प्रकास आंबेडकरांनी उपस्थित केली शंका

लढले सर्वांनी पाहिजे

एकत्र लढले पाहिजे, एकटे लढले पाहिजे

पश्चिम बंगाल मध्ये परिस्थिती वेगळी आहे

महाराष्ट्रात परिस्थिति वेगळी आहे

ज्या कंपन्याचा प्रॉफिट २०० कोटी आहे त्यांनी १३०० कोटीचे बॉंड कसे दिले

मोदींना हरवण्यासाठी नाही तर देश तोडणाऱ्यांविरोधात आमचा लढा ; तेजस्वी यादव शिवतीर्थावरून गरजले

आज मुंबईत भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस

आज एकाबाजून द्वेश पसरवली जात आहे … ईडी सीबीआयच्या माध्यमातून पक्षांवर दबाव टाकला जात आहे… लोकशाहीला धोका निर्माण झालाय… दुसरीकडे.. लोकांमध्ये प्रेम वाटण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत

देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय

मोदींना हरवण्यासाठी नाही तर देश तोडणार्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढत आहेत

स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक नेते तयार केलेल्या महाराष्ट्राच्या भूमिला सलाम; फारुख अब्दुल्ला यांचे उद्गार

मी या मातीला सलाम करतो

स्वातंत्र्य लढ्यासाठी या जमिनीत अनेक नेते तयार झाले..

कन्याकुमारीपासून आलेली यात्रा काश्मिरमध्ये आणि आता मणिपूरपासून मुंबईत आली

भारताला स्वातंर्य करणार्यांच रक्त आगलेल आहे.. तो मताचा अधिकार तुमच्याकडे आहे

मशीन ही चोर आहे… तुम्ही मत दिल्यानंतर तो कागद तपासून पाहा

इझिया आघाडीच बहुमत आल्यावर ही मशीन बाजूला होईल… निवडणूक आयोग स्वातंत्र्य होईल

मोदींनी १९ परदेशी यात्रा केल्या आणि चुकीचा प्रचार केला; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन

कन्याकुमारीपासून सुरू झालीये ही यात्रा लवकरच दिल्लीपर्यंत पोहचेल

या यात्रेत त्यांनी अनेक अडछणींचा सामना केला… भाजपाने त्यांना अनेक ठिकाणी परवानगी देण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांनी आपली यात्रा पूर्ण केली

इंडिया म्हणजे एकता

मोदींनी त्यांच्या काळात १९ परदेशी यात्रा केल्या आणि चुकीचा प्रचार केला

मोदी म्हणाले की इंडिया आघाडी ही भ्रष्टाचारी आहे पण इलेक्टॅान बॅाडने सत्य समोर आणला. भाजपा भ्रष्टाचारी आहे

इलेक्शन जाहीर झाले आहेत… भाजपाला हरवणं हे एकमेव लक्ष्य आहे. तेच भारत जोडो यात्रेच खर यश असेल

भारताला वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सोबत याव

त्यांच्याकडे इलेक्ट्रॅाल बाँड्स होता आमच्याकडे संविधान आहे, दिपांकर भट्टाचार्य

पैशांच्या बदल्यात शेतकर्यांचा घाम जिंकेल

जे एन यू ला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे… तिथेही निवडणूक होणार आहे

त्यांच्याकडे इलेक्ट्रॅाल बाॅंड होता आमच्याकडे संविधान आहे.. मत देण्याची ताकद आहे

नागरिकांना बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे

मुंबई केवळ मुंबई नाही तर संपूर्ण हिंदुस्थान आहे.. भारताच्या कानाकोपर्यातून लोक येथे येऊन राहतात

आज शिवाजी पार्कमधून हा आवाज बुलंद करायचू आहे

जुमला नाही जबाब दो..

राहुल गांधी यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत; वर्षा गायकवाड

मुख्यमंत्र्यांनी काळा दिवस म्हणून टीका करू नये

काळा दिवस तो असतो इडी ची चौकशी सुरू असणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा

आम्ही सर्व एका विचाराने एकत्र आलेलो आहोत

लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत

बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला आणि महात्मा गांधी यांना राहुल गांधी यांना अभिवादन केलेला आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सभे आधी राहुल गांधी नमन करणार आहेत

तसेच राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळालाही भेट देणार आहेत

मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने, मराठा आरक्षणाची मागणी करत, व्हाट्सअपला स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक गावात घडलीय. प्रवीण दिलीप सोनवणे वय 29 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

नाशिकच्या लासलगाव येथील योगेशवर कृषी एजन्सी दुकानाला आग

नाशिकच्या लासलगाव येथील योगेशवर कृषी एजन्सी दुकानाला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. दुकान बंद असताना ही आग लागली, लासलगावच्या मुख्य रस्त्यावर हे दुकान असून आग लागल्याचे समजताच लासलगाव ग्रामपंचायत तसेच चांदवड येथील अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने संपूर्ण दुकानातील माल जाळून खाक झाला. मुख्य रस्त्यावर हे दुकान असल्याने रस्त्याने जाणाऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती.

शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे, तिथे काँग्रेसची सभा होतं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

आमची खरी शिवसेना आहे पक्षाचं नाव व चिन्हही आमच्याकडे आहे हळूहळू सर्वच येतील.

आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्या ठिकाणी काॅग्रेसची सभा होतं असून त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे

ज्या राहुल गांधीनी सावरकर यांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडीलावून काही जणं बसलेत

त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं

जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, महायुतीचे सर्व समन्वयक जागा वाटप होईल

आमशा पाडवी हे वेगळे नाहीत ते आमचेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

आमशा पाडवी हा वेगळा नाही तो आमचा माणूस आहे. जाता जाता आम्ही त्याला मतदान करून गेलो.

काही जण म्हणत होते जाता जाता एकाचा तरी कार्यक्रम करू... नंतर म्हटलं जाऊदे

ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील तर ती कसली शिवसेना...

शेकडो लाखो हजरो शिवसैनिक सोबत येत आहे. मग खर्या अर्थाने चुकीचा निरणय कुणी घेतला हे लक्षात येतयं

ज्या काॅग्रेससोबत एवढी वर्ष लढलो. त्यांच्यासोबत कसं बसायचं

आपण युतीत लोकसभा व विधानसभा लढलो. मग सरकार कोणाचं स्थापन व्हायला हव़ होतं.

सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार

काल रात्री महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय

चंद्रहार पाटीलच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब

21 मार्चला सांगली आणि मिरज मध्ये स्वतः उद्धव ठाकरे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी जनसंवाद मेळावा घेणार

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का आमदार आमशा पाडवी करणार शिंदे गटात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार आमशा पाडवी यांचा थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होतं आहे

आमशा पाडवी यांच्यासोबत १० ग्रामपंचायत सरपंच, उपजिल्हाप्रमुख असे १०० पदाधिकारी पक्ष प्रवेश करत आहेत

पाणीपुरवठा योजनेत अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; खंडपीठाचे आदेश.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात ढोरकीन, बिडकीन परिसरात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. या योजनेसाठीचा कालावधी वाढवून देण्याचा प्रस्ताव जी व्ही पी आर कंपनीने सादर केला, यावर शासनाने त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश न्यायमूर्तींनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले. शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरळीत व्हावे यासाठी योग्य ते संरक्षण पुरवण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली

नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली

अर्धापूर तालुक्यातील देवाग कुराडा या गावात काही तरुणांनी आमदार कल्याणकर यांची गाडी फोडली

एका लग्न कार्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर हे आज देगाव कुराडा येथे गेले होते

गाडी पार्किंगमध्ये लाऊन ते लग्न कार्यात गेले, तेव्हा त्यांची गाडी फोडण्यात आली

मराठा आंदोलकानी त्यांची गाडी फोडल्याची चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची पुन्हा निवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची पुन्हा निवड

2024 ते 2027 या कालावधीसाठी सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड

2021 पासून होसबळे यांच्याकडे आरएसएस चे सरकार्यवाहपद

नागपुरात सुरू असलेल्या आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होसबळे यांची एकमताने निव

प्रकाश आंबेडकर यांच्या निमंत्रणाला राहुल गांधी यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही

प्रकाश आंबेडकर यांचं राहुल गांधी यांना राजगृहावर पाहुणचारासाठी निमंत्रण

मात्र राहुल गांधी यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही

राहुल गांधी यांच्या आजच्या वेळापत्रकात राजगृहाबाबत उल्लेख नाही

त्यामुळे राहुल गांधी आज भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाणार की नाही याबाबत अद्याप सस्पेन्स

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आजच्या सभेला उपस्थित राहणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्राद्वारे काँग्रेसला कळवलं आ

पुण्यात NIAची मोठी कारवाई; कोंढवा भागातील मालमत्ता जप्त

एन आय ए ने पुण्यातील कोंढवा येथील मालमत्तेवर केल्या जप्तीची कारवाई केली आहे. एन आय ने पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या मिठानगर परिसरातील ४ मालमत्तेजवळ नोटिसंचे फलकही उभारले आहेत. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांनी या मालमत्ता दहशतवादी कृत्य करण्यासाठी वापरण्यात आल्या असल्याने एनआय ए ने ही कारवाई केली आहे.

मुंबई उत्तर पश्चिम जागा अखेर ठाकरे गटाकडेच ?

महाविकास आधाडीच्या बैठकीत उत्तर पश्चिम जागा ठाकरे गटाला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. या जागेवर काँग्रेसकडून मुंबई माजी अध्यक्ष संजय निरूपम आग्रही होते. मात्र आता ही जागा ठाकरे गटालाच मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निरूपम वेगळा निर्णय घेणार की ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे - संजय राऊत

प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे - संजय राऊत

लोकशाही मानत असल्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्याशी चर्चा सुरू

देशातील संविधान, लोकशाही धोक्यात असून त्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू 

मुंबई उत्तर-पश्चिम जागा अखेर ठाकरे गटाकडेच?

मुंबई उत्तर पश्चिम जागा अखेर ठाकरे गटाकडेच ?

संजय निरूपम यांच्यावर बंडोखोरीची वेळ येणार?

निरूपम वेगळा निर्णय घेणार की ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार याकडे लक्ष

महाविकास आधाडीच्या बैठकीत उत्तर पश्चिम जागा ठाकरे गटाला दिल्याची सूत्रांची माहिती

या जागेवर काँग्रेसकडून मुंबई माजी अध्यक्ष संजय निरूपम आग्रही होते

शिवाजी आढळराव पाटील यांचा रविवारचा जनता दरबार रद्द

शिवाजी आढळराव पाटील यांचा रविवारचा जनता दरबार रद्द

मुंबईत महत्वाची बैठक असल्याची कारण देत जनता दरबार रद्द केला

आढळराव पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडली

पुढचे दोन दिवसात योग्य निर्णय घेऊ, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला

शिरुरच्या जागेबाबत आढळराव पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

शिरुरमधून आढळराव पाटील कुठल्या चिन्हावर लढणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही

शिरुरच्या मैदानात आढळराव पाटील लढण्यावर ठाम

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण, अरविंद केजरीवाल यांना ED कडून पुन्हा समन्स

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED कडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स

केजरीवाल यांना ED ने नवव्यांदा समन्स पाठवलं

21 मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

यापूर्वी पाठवलेल्या समन्सनंतर केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते

उलट त्यांनी ED ला पत्र लिहून ही राजकीय सुडापोटी कारवाई असल्याचा आरोप केला होता

केजरीवाल चौकशीला हजर राहत नसल्याने ED ने कोर्टात देखील धाव घेतली होती, तिथून केजरीवाल यांना जामीन मिळाला होता

तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या गुन्हेगाराची परिसरात धिंड, पुणे पोलिसांची कारवाई

पुणे पोलिसांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या गुन्हेगाराची परिसरात धिंड काढण्यात आली. चंदन नगर भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी धीरज दिलीप सपाटे याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची चंदननगर परिसरात धिंड काढण्यात आली. सपाटे आणि त्याच्या साथीदारांनी खराडी परिसरात महिन्याभरापुर्वी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, धीरज सपाटे हा गेल्या महिन्याभरापासून फरार होता. त्याला चंदननगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्याची परिसरातून धिंड काढण्यात आली.

उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना बोलावलं मातोश्रीवर

उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना बोलावलं मातोश्रीवर

दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू असून आज दोघांमधील वाद मिटवण्यासाठी दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं

अंबादास दानवे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, मात्र चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय

त्यामुळे आज कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याची माहिती

सकाळी 11.30 वाजता दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं आहे

राहुल गांधी यांची मुंबईत 'न्याय संकल्प पदयात्रा'

राहुल गांधी यांची मुंबईत 'न्याय संकल्प पदयात्रा'

मुंबईतील मणिभवन पासून ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत राहुल गांधी यांची पदयात्रा

महात्मा गांधी यांचे तत्कालीन वास्तव्य असणाऱ्या मणिभवन या ऐतिहासिक वास्तूपासून राहुल गांधी यांची पदयात्रा

महात्मा गांधी यांनी भारत छोडो हा इंग्रजां विरुद्ध पुकारलेला संकल्प ज्या ठिकाणी मांडला त्या ऑगस्ट क्रांती मैदानात होणार राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा समारोप

मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान दरम्यान होणाऱ्या या पदयात्रेत राहुल गांधी सामान्य नागरिकांची भेट देखील घेणार

पदयात्रेत प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते उपस्थित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com