Today's Marathi News Live : बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद

Today's Marathi latest news update (20 April 2024) : देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
Aajchya Marathi Batmya Live 20 April 2024 | Latest Updates on  IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi, Salman Khan and overall Maharashtra
Aajchya Marathi Batmya Live 20 April 2024 | Latest Updates on IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi, Salman Khan and overall MaharashtraSaam TV

बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद

बारामतीला पाणी पुरवणाऱ्या निरदेवघर धरणाचे पाणी बंद करण्यात आले आहे. बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी आता बंद झालं आहे. यामुळे बारामतीविरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या सभेला फटका

जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सभेपूर्वी पाऊस झाल्याने सभा रद्द झालीय. झाल्टा फाटा ता जि छत्रपती संभाजीनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय.

चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांचे उमेदवारी अर्ज वैध

संजयकाका पाटील यांचा भाजप पक्षाकडून तर चंद्रहार पाटील यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अर्ज वैध करण्यात आलाय. तर विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज वैध ठरलाय. सांगली लोकसभा निवडणुकीत ३० उमेदवाराचे एकूण ३९ अर्ज होते. यामध्ये एकूण २५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र छाननीत वैध ठरलेत. दरम्यान आता विशाल पाटील बंडखोरी कायम ठेवत अपक्ष लढणार का? याकडे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल आहे.

गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी; लाचखोर पोलीस उपनिरीक्षक ACBच्या जाळ्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून देण्यासाठी १० लाखांची मागणी करणारा दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईत दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे याच्यासह लाचेच्या रक्कमेपैकी एक लाख स्वीकारणारा खाजगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा या दोघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी

खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, भोसे, शेलपिंपळगाव, काळुस, बहुळ आणि दावडी परिसरात पाऊस होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय.

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरूवात

जिल्ह्यातील उमरगा,लोहारा,नळदुर्ग,तुळजापूर,धाराशिव व कळंब,परंडा परीसरात जोरदार पाऊस सुरू झालाय.

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यात भीषण पाणीटंचाई

धरणांचा तालुक्यात अशी ओळख असलेल्या इगतपुरीत भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय. इगतपुरी शहराच्या पाणीपुरवठ्यात सरसकट २५ टक्के पाणी कपात करण्यात आलीय.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस

अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झालीय.

भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर येथे थोड्याच वेळात प्रचार सभेला सुरवात होणार आहे. अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी पहिली मोठी सभा आहे.

उल्हासनगरमधील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये लागली आग

उल्हासनगर चार येथील शासकीय रुग्णालयासमोरील सपना कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी दुपारी अचानक आग लागली. याठिकाणी स्थानिक दुकानदार व नागरिकांनी अग्निशमन उपकरणे वापरून आग विझविण्याचा प्रयत्न केला. येथून जाणाऱ्या एमएसईबीच्या पथकाने तातडीने वीजपुरवठा बंद केला.अग्निशमन दलाचे पथक दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडून पदाधिकाऱ्यांचा मेळावा

बाळा नांदगावकर सोबत युतीमधील शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत.

पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल उपस्थित आहेत.

भिवंडी येथील समाजवादी पक्षाचे आमदार शेख यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

भिवंडी येथील राजकारणात मोठी उलथापालथ झालीय. समाजवादी पक्षाच आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अचानक नाशिक दौऱ्यावर

जे पी गावीत यांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर निघालेत. जयंत पाटील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा यांच्याकडून बंद दाराआड आढावा घेणार आहेत. पाटील यांचा दौरा महत्वाचा असणार आहे. भास्कर भगरे यांना पाडणार, असा इशारा जे पी गावीत यांनी दिलाय.

अमरावतीमध्ये २४ एप्रिलला राहुल गांधी यांची सभा

नारायण राणे यांच्यासाठी आता राज ठाकरेंची मनसे मैदानात

नारायण राणे हे आमचे घरचे उमेदवार त्यांना आम्ही निवडून आणू , असं वक्तव्य अविनाश जाधव केलंय. ते कणकवलीमध्ये बोलत होते. राणे साहेबांनी मागील ४० वर्षात जे काम केलंय ते संपूर्ण महाराष्ट्राला माहितेय. काल मला वैभव खेडेकरांनी माहिती दिली राणे साहेबांनी कोकणातील ७५०० लोकांना मुंबईत बेस्ट मध्ये नोकरीला लावलं. मुंबईत आम्ही फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी आम्हाला सांगतात आम्हाला घरे राणे साहेबांनी दिली. आम्ही शपथ घेतलीय. राणे साहेब जिंकणारच, असे अविनाश जाधव म्हणालेत.

रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी; आंबा आणि काजू पिकावर परिणाम

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान पावसाच्या सरी बरसल्याने काही ठिकाणी गारवा जाणवला. पण, रिमझिम पाऊस थांबल्यावर मात्र उकाडा कमालीचा वाढत आहे.

अजित पवारांनी केली अपघातग्रस्ताला मदत

बारामतीतील काटेवाडीच्या मार्गावर एक अपघात झाला. त्यानंतर तातडीने ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात उपचाराच्याही सुचना दिल्या.

सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर

सुप्रिया सुळे यांना अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर डमी भरलेल्या सचिन दोडके यांचाही अर्ज मंजूर करण्यात आला आहे. सचिन दोडके यांचा अपक्ष अर्ज मंजूर केला आहे. यामुळे आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार आहे. आज अर्ज छाननी साठी अनेकांना बोलावण्यात आलं. एकाच पक्षाचे दोन फॉर्म असल्याने एक जणाचा अर्ज मंजूर करण्यात आला.

अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर


अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर करण्यात आलाय.

निवडणूक आयोगाकडून अर्जाची तपासणी करण्यात आली, या तपासणीत अजित पवारांचा अर्ज नामंजूर

ज्योती मेटे यांची बीड लोकसभा निवडणुकीतून माघार

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची बीड लोकसभा निवडणुकीतून माघार..

मुंबईतून जाहीर केली होती, मी निवडणूक लढणार..म्हणून भूमिका

आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार नाही म्हणून भूमिका केली जाहीर

मोदींनी राम मंदिरच नाही तर राम राज्य आणलं - CM एकनाथ शिंदे

नांदेडमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

देशाच्या विकासासाठी मोदींना देशाची जनता पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी तयार झाली आहे.

मोदींनी राम मंदिरच नाही तर रामराज्य आणले आहे. देशाची जनता म्हणत आहे .माझ्या जवळ मोदी गॅरंटी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभास्थळी आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये सभास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित.

छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केल नाही : वीरेंद्र मंडलिक

छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केल नाही, खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचे वक्तव्य

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत - संजय राऊत

सांगलीत संजय राऊत काय म्हणाले?

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत.

उद्धव ठाकरे च्या मनात प्रेम,

विशालच्या मनात शिवसेना बदल प्रेम

वसंत मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे चार कोटींहून अधिक मालमत्ता

वसंत मोरे यांनी शुक्रवारी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मोरे यांच्याकडे अनेक गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे चार कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

मोरे यांच्यावर तीन कोटी ४९ लाख २३ हजार ४३९, पत्नीवर १८ लाख ८९ हजार, तर मुलावर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे.

मोरे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. मोरे यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत.

मोरे यांच्याकडे इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या चारचाकी, तर बुलेटसह सहा दुचाकी आणि एक ट्रक आहे. मोरे यांच्याकडे ७० ग्रॅम, पत्नीकडे २७० ग्रॅम सोने आहे.

वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सांगलीचे विशाल पाटील यांना काँग्रेस निलंबित करण्याची शक्यता

विशाल पाटील यांना काँग्रेस निलंबित करण्याची शक्यता

विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळे काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता

सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यास काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता

सांगलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला

विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता

येडेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी, वाहतूक मार्गात बदल

येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सव २२ ते २८ एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे. यामध्ये २३ ते २४ एप्रिल रोजी होणाऱ्या पालखी मिरवणूक,चुनखडी वेचने या मुख्य या प्रमुख कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने भाविक येरमाळा नगरीत येत असतात. त्यामुळे या भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या भाविकांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज मंडळी राहणार उपस्थित

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज मंडळी मतदार संघात येणार

२४ एप्रिलच्या अमित शहांच्या सभेत दिग्गज राहणार उपस्थित

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील येणार राणेंच्या प्रचाराला

महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रचारासाठी विशेष रणनीती

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री देखील राहणार अमित शहांच्या सभेला हजर

तर राणेंचे मित्र आणि सहकारी नितीन गडकरी सुद्धा २८ एप्रिलला राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात

पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर परिसरात झाडांवर विषप्रयोग

पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर परिसरात ४१ झाडांवर विषप्रयोग

विषप्रयोग झाल्याच समोर येताच पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवर पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

२२ फॉक्सटेल पाम, १६ पेल्टोफोरम, २ सुभाबूळ आणि एक पिंपळाच्या झाड कापली तसेच त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याच समोर आलंय.

महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल

जाहिरातींच्या होर्डिंगसाठी वृक्षतोड केल्याचा संशय

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल

सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकात लॉरेन्स बिश्नोई गँगचा माणूस येणार आल्याची दिली माहिती

लाल रंगाचा शर्ट घातलेला लॉरेन्स बिश्नोई गँगचा माणूस येणार असून तो मुंबईत काही करणार असल्याची दिली माहिती

दुसऱ्या एका व्यक्तीला फोनवर बोलताना त्याच संभाषण ऐकल्याचा कॉलरचा दावा

मध्यरात्री १०० नंबरवर आला होता कॉल

मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलीस तसेच GRP ला दिली माहिती

थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात 38 अंश तापमानाची नोंद

मागील काही दिवसापासून मावळातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. पर्यटननगरी व थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरांमध्ये 38 अंश तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांमध्ये लोणावळा शहरातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. या सरासरी 38 ते 40 अंशापर्यंत लोणावळा शहराचे तापमान गेल्याने पुणे जिल्ह्याप्रमाणेच लोणावळा शहरात देखील उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा आणि रात्री देखील वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com