नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार उघड, 8 लाखांचे धान्य जप्त; दोघांना अटक

पोलिसांनी रेशन दुकानात छापा मारला असता त्या ठिकाणी आणखी काही पोती साठवून ठेवली असल्याचे आढळले, दरम्यान पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोन आरोपीना अटक केली असून जवळपास 8 लाख किमतीचे धान्य जप्त केले.
नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार उघड, 8 लाखांचे धान्य जप्त; दोघांना अटक
नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार उघड, 8 लाखांचे धान्य जप्त; दोघांना अटकSaam TV
Published On

नागपूर : नागपुरात (Nagpur) रेशन धान्याचा काळाबाजार वाढत असल्याचे पोलिसांच्या करवाईतून समोर आले आहे. कळमना पोलीस रात्रीची पेट्रोलिंग करत असताना त्यांना चार चाकी गाडीतून धान्य नेलं जात असल्याचे दिसून आले, त्यावरून पोलिसांनी चौकशी केली असता रेशन धान्य हे वेगळ्या पोत्यांमध्ये भरून नेले जात असल्याचं निष्पणं झालं. त्या वाहन मालकाकडे कुठलीही कागदपत्र नव्हती, जेव्हा विचारपूस केली असता हा माल बुट्टीबोरीच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या दुकानातून आल्याचं स्पष्ट झालं.

नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार उघड, 8 लाखांचे धान्य जप्त; दोघांना अटक
जिवंतपणीच घातला तेरवीचा कार्यक्रम; अमरावतीमधील 'त्या' पोलिसाच्या तेराव्याची सर्वत्र चर्चा

दरम्यान पोलिसांनी बुट्टीबोरी मधील त्या दुकानात छापा मारला असता त्या ठिकाणी आणखी काही पोती काळाबाजार करण्यासाठी साठवून ठेवली असल्याचे समजले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोन आरोपीना अटक केली असून जवळपास 8 लाख रुपये किमतीचे गहू आणि तांदूळ जप्त करण्यात आले आणि अन्न वितरण विभागाला जप्त केलेल्या धान्याची सूचना देण्यात आली आहे.

हे देखील पहा -

रेशनिंगच्या दुकानात (Ration Shops) मिळत असलेलं हे धान्य गरिबांना कमी किमतीमध्ये देण्यात येते यावर अनेक गरिबांच घर चालत मात्र दुकानदार किंवा दलाल मात्र हे बाहेर मार्केट मध्ये विकून गरिबांनवर अन्याय केला जातो याची पाळंमुळं शोधून काढण्याची गरज आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com